शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीतील घोळ : डीएमओ,वाहतूक कंत्राटदार, ग्रेडर पुरविणारी कंपनी दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:48 IST

अकोला :‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘डीएमओ’ विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार असून, वाहतूक कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट ’ करण्यात येणार आहे. ग्रेडर पुरविणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सोमवारी विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ मे रोजी दिला होता.

- संतोष येलकर

अकोला :‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालात जिल्हा मार्केटींग अधिकारी (डीएमओ), वाहतूक कंत्राटदार व ग्रेडर पुरविणारी कंपनी दोषी आढळली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘डीएमओ’ विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार असून, वाहतूक कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट ’ करण्यात येणार आहे. तर ग्रेडर पुरविणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सोमवारी विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांत जागा उपलब्ध नसल्याचे सांगून वारंवार तूर, हरभरा खरेदी बंद करण्यात आली; मात्र त्याचवेळी जिल्ह्याबाहेरील तूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोदामांत साठविण्यात आली, तसेच तूर खरेदीत गैरप्रकारही झाले . त्यामुळे तूर खरेदीत जिल्ह्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील ‘एमआयडीसी’स्थित वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आलेल्या तुरीची खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांनी गत १५ मे रोजी झाडाझडती घेतली होती. त्यावेळी गोदामांत जिल्ह्याबाहेरील साठविण्यात आलेली तूर निकृष्ट दर्जाची असल्याचे वास्तव समोर आले होते. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खासदार व आमदारांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुषंगाने नाफेडमार्फत जिल्ह्यातील तूर, हरभरा खरेदीसह जिल्ह्यातील गोदामांत जिल्ह्याबाहेरील साठविण्यात आलेली तूर व हरभरा व त्याचा दर्जा इत्यादी मुद्यांसंदर्भात चौकशी करण्यासाठी जिल्हा उप-निबंधकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ मे रोजी दिला होता. त्यानुसार जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था) गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीमार्फत जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशी अहवाल ३ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. चौकशी अहवालात जिल्हा मार्केटींग अधिकारी (डीएमओ), वाहतूक कंत्राटदार व ग्रेडर पुरविणारी कंपनी दोषी आढळली आहे. त्यामुळे दोषी आढळलेल्या जिल्हा मार्केटींग अधिकाºयाविरुद्ध विभागीय चौकशी करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, वाहतूक कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’ करण्यात येणार आहे आणि तूर व हरभरा खरेदीत ग्रेडींगसाठी ग्रेडर पुरविणाºया संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय