शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कामगारांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:03 IST

अकोला : महावितरणच्या जुन्या लघू व उच्चदाब विद्युत  वाहिन्यांमुळे कर्मचारी, नागरिक, गुरांचा अपघाती मृत्यू  होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या पृष्ठभूमीवर  या जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी  विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने राज्यव्यापी  आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग  म्हणून बुधवार, ६ सप्टेंबर रोजी महावितरणच्या प्रत्येक  विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्या त येणार आहेत. तर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ  कार्यालयांसमोर धरणे देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजुन्या विद्युत लाइन दुरुस्तीची मागणी विभागीय कार्यालयासमोर घेणार द्वारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या जुन्या लघू व उच्चदाब विद्युत  वाहिन्यांमुळे कर्मचारी, नागरिक, गुरांचा अपघाती मृत्यू  होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या पृष्ठभूमीवर  या जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी  विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने राज्यव्यापी  आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग  म्हणून बुधवार, ६ सप्टेंबर रोजी महावितरणच्या प्रत्येक  विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्या त येणार आहेत. तर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ  कार्यालयांसमोर धरणे देण्यात येणार आहे.वीज मंडळाचे विभाजन झाल्यानंतर इन्फ्रा-१ व इन्फ्रा-२  योजना आल्या. उपकेंद्रांची जुनी यंत्रणा बदलणे, त्यांची  क्षमता वाढविण्याचे काम करण्यात आले. परंतु जुन्या विद्यु त लाइन बदलल्या नाहीत. जुन्या वाहिनींवर विद्युत उ पकेंद्रांची संख्या वाढली, त्यामुळे लाइन कमकुवत झाल्या.  जुने निर्मितीचे संच बंद करून नवीन संच उभे करण्यात  आले. पारेषणनेदेखील उपकेंद्रांची संख्या वाढविली, नवीन  ब्रेकर बसविले; परंतु जुन्या लघू व उच्च दाब वाहिन्या मात्र  बदलल्या नाहीत. जुने खांब, स्ट्रक्चर, विद्युत वाहिनीमुळे  कर्मचारी, नागरिक, मुके प्राणी यांचे जीव धोक्यात आले  आहेत. शॉक लागून, कमकुवत स्ट्रक्चरवर तुटल्याने  अनेक कर्मचार्‍यांना प्राण गमवावा लागला आहे. रोज  विद्युत अपघात घडत आहेत; परंतु याकडे लक्ष द्यायला  कोणी तयार नाही. यासाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार  युनियनने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.  यानुसार बुधवार, ६ सप्टेंबर रोजी महावितरणच्या प्रत्येक  विभागीय कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन निदर्शने करण्या त येणार आहेत, तर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ  कार्यालयांसमोर धरणे देण्यात येणार आहेत. याची दखल न  घेतल्यास संघटना मुख्य कार्यालय मुंबई येथे आंदोलनाचा  निर्णय घेईल, असे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी  कळविले आहे.

या आहेत मागण्याजुन्या लघू व उच्चदाब वाहिनीच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र  इन्फ्रा स्थापन करा.कमकुवत झालेल्या खांबांवर कर्मचार्‍यांना चढवू नका.शिडीगाडीची व्यवस्था करा.अपघात होऊ नये, यासाठी अधिकार्‍यांची जबाबदारी  निश्‍चित करा.सुरक्षा साधने व सुरक्षा उपायांना प्राधान्य द्या.