शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२ ऑक्टोबरपासून तलाठी देणार नाहीत १२ प्रकारचे दाखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:48 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठय़ांमार्फत नियमबाहय़ १२ प्रकारचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे  येत्या २ ऑक्टोबरपासून विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये नियमबाहय़ दाखले देण्याचे काम बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे. 

ठळक मुद्देविदर्भ पटवारी संघाचा निर्णयस्वातंत्र्यपूर्व काळापासून १२ प्रकारचे दाखले नियमबाहय़ दिले जात आहेत

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठय़ांमार्फत नियमबाहय़ १२ प्रकारचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे  येत्या २ ऑक्टोबरपासून विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये नियमबाहय़ दाखले देण्याचे काम बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे. जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार गाव नमूने १ ते २१ ची सत्यप्रत देण्याचे अधिकार तलाठय़ांना आहेत; परंतु याव्यतिरिक्त स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठय़ांमार्फत नियमबाहय़ १२ प्रकारचे दाखले वितरणाचे काम तलाठय़ांकडून करण्यात येत आहे. कोणताही कायदेशीर आधार नसताना, तलाठय़ांकडून बेकायदेशीर १२ प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत असल्याने, तलाठी आणि शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमबाहय़ दाखले वितरणाचे काम येत्या २ ऑक्टोबरपासून विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये बंद करण्यात येत असल्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे. त्यानुषंगाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावपातळीवर तलाठय़ांमार्फत परंपरागत सुरू असलेले १२ प्रकारचे दाखले वितरणाचे काम बंद होणार आहे.

असे आहेत १२ दाखले!वारसाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क प्रमाणपत्र, हैसियत प्रमाणपत्र, एकत्रित कुटुंबाचे प्रमाणपत्र, चतु:सीमा प्रमाणपत्र-दाखला, विद्युत जोडणीकरिता नाहरकत प्रमाणपत्र, विहीर असल्याचा-नसल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ओलिताचे प्रमाणपत्र, विद्युत पंप-डिझेल पंप असल्याबाबतचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी १२ प्रकारचे दाखले २ ऑक्टोबरपासून तलाठय़ांकडून देण्यात येणार नाहीत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठय़ांमार्फत नियमबाहय़ १२ प्रकारचे दाखले वितरित करण्यात येत असून, त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे तलाठय़ांना आणि शेतकर्‍यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये गैरकायदेशीर १२ प्रकारच्या दाखल्यांचे वितरण २ ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे.- मनोज दांडगेकेंद्रीय अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ