शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

टोकन यादी; १३७१ नावे गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:19 IST

अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील तुरीचा घोळ जिल्हाधिकारी कार्यालयाचा घोळ

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  नाफेडद्वारे तालुकास्तरावरील खरेदी केंद्रांवर हमीदराने तूर खरेदी  १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मेपर्यंत  टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप  योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेत ३१ ऑगस्टपर्यंत तूर  खरेदी पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु टोकन  दिलेल्या शेतकर्‍यांच्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी करायची  की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात  आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार  समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकर्‍यांचे नाव, गाव व टोकन  नंबरसह यादी पाठविण्यात आली. अकोट कृषी उत्पन्न बाजार  समितीनेसुद्धा ४ हजार ९१७ टोकनधारक शेतकर्‍यांची यादी  पाठविली. जिल्हाधिकार्‍यांनी टोकन देण्यात आलेल्या शे तकर्‍यांची तूर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या घरी जाऊन तुरीचे  पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करण्याकरिता तलाठी व कृषी  सहायकांना निर्देश दिले, तसेच ज्या टोकनधारक शेतकर्‍यांचे  पंचनामे करावयाचे आहेत, त्यांची यादी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली; परंतु  या अधिकृत यादीमधून अकोट बाजार समितीने पाठविलेल्या  यादीमधील धरसोड करीत मधातल्या तब्बल १ हजार ३७१ शे तकर्‍यांची नावे गहाळ करण्यात आली असल्याचे उघडकीस  आले आहे. त्यामध्ये अकोट बाजार समितीने ४ हजार ९१७ टोकनधारक शे तकर्‍यांची यादी दिली. त्यापैकी ७३८ शेतकर्‍यांचे मोजमाप  झाले, तर पंचनाम्याकरिता अपलोड केलेल्या यादीत २१२२ शे तकर्‍यांची नावे आहेत; परंतु ती नावेसुद्धा कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या टोकन रजिस्टरप्रमाणे नाहीत. त्या यादीमधील  अनुक्रमे ७३८ ते १७५३ यादरम्यानच्या १११५ शेतकर्‍यांची  नावे, १८९0 ते २0६८ मधील १७८ तर ४२४८ ते ४२८५ मधील  ३७ आणि ४३१२ ते ४३५३ यामधील ४१ असे एकूण १ हजार  ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षित पणामुळे गहाळ झाले असल्याचे दिसून येत आहे. या यादीनुसार  तलाठी व कृषी सहायकांनी पंचनामा करण्यास प्रारंभ केला  आहे. तर दुसरीकडे मधातील टोकनधारक शेतकर्‍यांची नावे  गहाळ असल्याने त्याच्यापुढील शेतकर्‍यांचे पंचनामे होण्याची  शक्यता आहे.