शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचा घोळ; चौकशी समितीचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:01 IST

अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या शौचालयांची तपासणी करण्यासाठी सत्तापक्ष भाजपने चौकशी समितीचे गठन केले.

अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या शौचालयांची तपासणी करण्यासाठी सत्तापक्ष भाजपने चौकशी समितीचे गठन केले. समितीच्या अध्यक्षपदी उपायुक्त सुमंत मोरे यांची नियुक्ती करून इतर अधिकाºयांचा समावेश केला जाणार होता. लोकमतने ‘जिओ टॅगिंग’चा विषय चव्हाट्यावर आणल्यानंतर महिनाभरापासून अद्यापही चौकशी समितीचा काहीही ठावठिकाणा नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एकूणच या मुद्यावर प्रशासनासह खुद्द सत्ताधारी पक्षाची भूमिका संशयाच्या घेºयात सापडली आहे.शहरात ‘जिओ टॅँगिंग’चे सर्व निकष-नियम पायदळी तुडवित उभारण्यात आलेल्या १८ हजारपेक्षा जास्त शौचालयांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मनपा प्रशासनाने वैयक्तिक शौचालय उभारण्याचे काम खासगी कंत्राटदारांना दिले होते. महापालिकेत कार्यरत कर्मचाºयांचे नातेवाईक, मर्जीतले कंत्राटदार आदींनी निकृष्ट दर्जाची शौचालये उभारून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचे समोर आले आहे. कंत्राटदारांनी उभारलेल्या वैयक्तिक शौचालयांची संख्या ९ हजारपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. एका शौचालयासाठी १५ हजार रुपयांचे अनुदान होते. कंत्राटदारांनी लाभार्थींना हाताशी धरून घरी अस्तित्वात असलेल्या शौचालयाच्या बदल्यात अनुदान लाटल्याची माहिती आहे. निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या वर्षभराच्या कालावधीत अनेक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालय बांधकामात घोळ झाला असतानाही मनपा प्रशासन ‘ओडीएफ’चा (उघड्यावर शौचास मुक्त) दर्जा मिळवण्यासाठी आग्रही होते. शौचालय बांधकामातील घोळ तपासण्यासाठी सत्तापक्ष भाजपने चौकशी समितीचे गठन करीत समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत शहराला ‘ओडीएफ’चा दर्जा न देण्याचा निर्णय २२ नोव्हेंबरच्यास विशेष सभेत घेतला होता.समितीमध्ये फेरबदल; धोरण स्पष्ट नाही!शौचालयांची तपासणी करणाºया चौकशी समितीमध्ये कार्यकारी अभियंत्यांचा समावेश करावा, अशी मागणी सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी लावून धरली होती. तसा प्रस्ताव २२ नोव्हेंबरच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर तातडीने अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. तसे आजपर्यंतही झाले नाही. मुळात शौचालयांचा घोळ उघडकीस यावा, अशी अनेकांची इच्छा नसल्याने समितीच्या संदर्भात धोरण स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका