लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने लागू केलेल्या करवाढीच्या मुद्यावर सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत ‘अमृत’ योजनेंतर्गत ८७ कोटी रुपयांतून पाणीपुरवठय़ाची कामे निकाली काढण्याचा विषय पटलावर ठेवण्यात येईल. जीएसटी लागू झाल्यामुळे संबंधित कंपनीने जीएसटीच्या बदल्यात अतिरिक्त रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम मनपा निधीतून देण्यावर चर्चा केली जाईल. प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत सुधारित कर वाढ लागू केली. मध्यंतरी महापौर विजय अग्रवाल यांनी अकोलेकरांना दिलासा देण्यासाठी एकूण कर रकमेच्या दहा टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात फेरबदल केले जातील. करवाढीच्या संदर्भात विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसंची भूमिका पाहता या मुद्यावर सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा होणे अकोलेकरांना अपेक्षित आहे.
आज मनपाची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:01 IST
अकोला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने लागू केलेल्या करवाढीच्या मुद्यावर सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
आज मनपाची सर्वसाधारण सभा
ठळक मुद्देवादळी ठरण्याची शक्यता