शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सुमेध यांच्या पार्थिवावर लोणाग्रा येथे आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:12 IST

अकोला :  जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शहीद झालेल्या सुमेध यांच्या पार्थिवावर सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोणाग्रा येथे    शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास   सुमेध यांचे पाíथव लोणाग्रा      येथे पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शहीद झालेल्या सुमेध यांच्या पार्थिवावर सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोणाग्रा येथे    शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास   सुमेध यांचे पाíथव लोणाग्रा      येथे पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सुमेध शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी गावात सकाळी ६ वाजेदरम्यान दिली. पोलिसांकडून ही माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. एकीकडे  दु:ख अन् दुसरीकडे गावचा सुपुत्र शहीद झाल्याचा सार्थ अभिमान, असे काहीसे  भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते. सुमेध यांच्या आई -वडिलांना धीर देत ग्रामस्थांनी सावरले. 

अखेरचे बोलणे!सुमेध यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधून ख्याली खुशाली विचारली होती. तसेच लहान भाऊ शुभमला सागर येथे भेटण्याचा मानसही बोलून दाखविला होता. ऑक्टोबर महिन्यात नक्की येणार, असे सांगून तूर्त सुट्टीवर येण्याचे टाळले होते. शुक्रवारी आई-वडिलांनी सुमेधशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत सुमेधशी बोलणेच झाले नाही आणि रविवारी पहाटेच सुमेध शहीद झाल्याची वार्ता समजली. 

पाच ठिकाणी केली सेवासुमेध गवई यांनी राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आसाम, पंजाब, पाकिस्तान बॉर्डर या ठिकाणी देशसेवा बजावली. गत सहा महिन्यांपूर्वीच सुमेध यांची जम्मू आणि काश्मीर येथे अडीच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 

१ ऑगस्टला  वाढदिवस साजरासुमेध गवई चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहते. त्यांचा लहान भाऊ शुभमही लष्करात सेवा बजावतो. १ ऑगस्ट रोजी सुमेध यांचा वाढदिवस साजरा झाला होता.

गृहराज्यमंत्र्यांकडून सांत्वनसुमेध गवई यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच राज्याचे गृह  राज्यमंत्री तथा पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, आ. बळीराम सिरस्कार आदींनी लोणाग्रा येथे धाव घेतली आणि सुमेध यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.