शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आज जागतिक पांढरा कोड दिन : जनजागृतीच्या अभावामुळे रुग्णांची हेटाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:42 IST

कोड एक जनुकीय आजार; रंगपेशी नष्ट होण्याचा परिणाम!

अकोला: त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने २५ जून हा दिन ‘व्हिटिलिगो’ अर्थात जागतिक पांढरे कोड दिन घोषित केला असून, या दिनावर विदर्भ डॅर्मोटॉलॉजी सोसायटीच्या वतीने संपूर्ण विदर्भात पांढरा कोड दिनचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनी कोड रुग्णांची तपासणी व त्यांना आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पांढरा कोड म्हणजे त्वचेवरील रंग नष्ट होऊन त्वचेचा रंग पांढरा होणे होय. रंग तयार करणाºया पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ म्हणतात. या पेशी काही कारणाने नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यास अडथळे येऊन त्वचेच्या भागात रंग तयार होत नाही. तिथे पांढरा डाग अर्थात कोड निर्माण होतो. अशा डागांचे शरीरावरील स्थान निश्चित नसते. पांढरे डाग कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतात. अगदी लहान बालकासही कोड होऊ शकतो. तथापि, हा संसर्गजन्य रोग नसून, अशा रुग्णांनी आपली तपासणी अवश्य करण्याचे आवाहन विदर्भ डर्मेटॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. संगीता भांबूरकर यांनी केले आहे.या रोगाला काही जेनेटिक दोषाची कारणे असू शकतात. या विकारात जनुकामधील त्वचेतील मेलॅनिन तयार करणाºया पेशी नष्ट होतात. मेलेनिनमुळे त्वचा व केसांचा रंग ठरत असतो. सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये हा रोग आनुवांशिकतेने झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. भांबूरकर यांनी सांगितले. कोड हा संसर्गजन्य रोग नसून, कोडाच्या व्यक्तीबरोबर राहिल्यानेही हा रोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.कोडाचे विविध प्रकारपांढºया कोडाचे प्रकार अनेक असून, जर कोडाचे चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला व्हिटिलिगो वल्गारीस असे म्हणतात. फक्त ओठावर, बोटांच्या टोकावर वा गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला ‘लीप टीप व्हिटिलिगो’ म्हणतात. एकाच ठिकाणी चट्टा असेल तर त्याला ‘लोकलाइजड व्हिटिलिगो’ म्हणतात. जर चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला ‘अन्स्टेबल व्हिटिलिगो’ म्हणतात. याच्या उपचारात विशिष्ट अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केल्या जातो. ही थेरपी अंगात रंग आणण्यासाठी उपयोगी आहे. लहान डागांसाठी लेसर थेरपीचा उपयोग केल्या जातो. तसेच कोड झालेल्या जागेवर सोरलीन नावाची औषधी लावून उन्हात उभे केल्या जाते.पांढºया डागाने खचून जाता काम नये. मनात न्यूनगंड न ठेवता निरंतर वैद्यकीय उपचार, औषधे, गोळ्या, मलम, त्वचेची लेसर व अन्य शस्त्रक्रियेने हा रोग बरा होऊ शकतो.- डॉ. संगीता भांबूरकर, अध्यक्ष, विदर्भ डर्मेटॉलॉजी सोसायटी, अकोला.