शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा बोजवारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:43 IST

अकोला : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावे, यासाठी केवळ जिल्हा, व तालुका स्तरावर अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आले असून, गावपातळीवर मात्र अद्यापपर्यंत पथकच स्थापन झाले नसल्याचे ...

ठळक मुद्देगाव पातळीवर अंमलबजावणी पथकच नाहीत तालुकास्तरावरील पथक उदासिन

अकोला : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास आळा घालण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावे, यासाठी केवळ जिल्हा, व तालुका स्तरावर अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आले असून, गावपातळीवर मात्र अद्यापपर्यंत पथकच स्थापन झाले नसल्याचे वास्तव आहे.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी शासनाने सिगारेट व तंबाखू नियंत्रण कायदा २००३ तयार केला असून, शासनाच्या विविध विभागांना त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार दिले आहेत. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हास्तरावर सदर कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी अंमलबजावणी पथकं तयार करण्याच्या सूचना आहेत. या अंमलबजावणी पथकांनी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी, सरकार व बिगर सरकारी कार्यालये, शिक्षण संस्था, आरोग्य संस्था तसेच तंबाखू विक्री केंद्र येथे नियमितपणे तपासणीसाठी भेटी देऊन कायद्याचे उल्लंघन करणाºया व्यक्तींकडून दंड वसूल करणे अपेक्षित आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, गावपातळीवर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी पथकांची स्थापनाच झालेली नाही. केवळ जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडून या कार्यक्रमाची व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे. तालुकास्तरावरील पथकांकडूनही या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे गावपातळीवर पथकच तयार नसल्यामुळे या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.सात महिन्यात केवळ २१०० रुपयांचा दंड वसूलअंमलबजावणी पथकांनी नियमितपणे विविध ठिकाणी तपासणीसाठी भेटी देऊन कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. मार्च २०१७ पासून या पथकांनी सप्टेंबरपर्यंत फक्त २१३० रुपये दंड वसुल केल्याची नोंद आहे. यापैकी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने १४३० रुपये, तर आकोट तालुका पथकाने ७०० रुपये दंड वसूल केला आहे. यावरून तालुकास्तरावरील पथक या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत किती सक्रिय आहेत, याची कल्पना येते.