शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांंचा शुल्क परतावा शासनाकडे थकीत!

By admin | Updated: March 4, 2016 02:20 IST

मेस्टाचा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्काराचा निर्णय.

अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार गोरगरिबांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता आणि या मुलांच्या शिक्षणाचे शुल्क राज्य शासन शिक्षण संस्थांना देणार होते. त्यानुसार चार वर्षांंपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गोरगरीब मुलांना २५ टक्क्यानुसार प्रवेश देण्यात आला; परंतु चार वर्षांंपासून शासनाने या मुलांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिलेला नाही. त्यामुळे येत्या २0१५ व १६ शैक्षणिक वर्षामध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण घेता यावे. या उद्देशाने राज्य शासनाने शिक्षणहक्क कायद्यानुसार, २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रतिसाद दिला आणि गोरगरीब विद्यार्थ्यांंना शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देण्याचे मान्य केले होते; परंतु गत चार वर्षांंपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मुलांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा मिळालाच नाही, त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांंमध्ये गोरगरीब मुलांना शाळेत कसा प्रवेश द्यावा. त्यांना मोफत प्रवेश दिला तर शाळांना त्यांच्यावरील शिक्षणाचा भार उचलावा लागतो. हा खर्च इंग्रजी माध्यमांच्या शाळांना झेपत नसल्याने, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकार्‍यांना वारंवार निवेदने दिली. त्यांच्याकडे शुल्क परतावा देण्याची मागणी केली; परंतु राज्य शासनाने त्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. राज्यातील इतर जिल्हय़ांमधील इंग्रजी शाळांना शुल्क परतावा देण्यात आलेला आहे; परंतु केवळ अकोला जिल्हय़ातच हा परतावा न मिळाल्याने मेस्टाने बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. मेस्टाने घेतलेला निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना कळविण्यात आला आणि जोपर्यंंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बँक खात्यात शुल्क परतावाची रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंंत जिल्हय़ातील एकही इंग्रजी माध्यमाची शाळा २५ टक्केनुसार प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही. शासनाकडून पुरेसा निधी आल्यानंतरही जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक शाळांना शुल्क परतावा देण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप मेस्टाने केला आहे.