शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमधील तिढा पुन्हा अनिर्णित

By admin | Updated: July 27, 2016 02:00 IST

शेतमालाच्या खरेदीचे व्यवहार बंद; अद्याप निर्णय नाहीच.

अकोला: राज्य शासनाच्या अडत वसुली खरेदीदारांकडून करण्याच्या अध्यादेशानंतर बाजार समित्यांमध्ये व्यापार्‍यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदीचे व्यवहार बंद आहेत. सोमवारच्या बैठकीनंतर मंगळवारी पुन्हा हा तिढा सोडविण्यासाठी बैठक झाली; परंतु या दुसर्‍या दिवशीच्या बैठकीतही तिढा सुटला नाही.शेतकर्‍यांना अडतीपासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन बाजार समित्यांमध्ये अडत शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचा अध्यादेश जारी केला; परंतु शेतकरी हिताचा हा निर्णय खरेदीदार व्यापार्‍यांना आवडला नाही. अडत देण्यास विरोध करून काही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्याची परवानगी बाजार समितीकडे मागितल्याचे समजते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा परवानगीची गरज नसून, नियमातच तशा सरळ खरेदीची तरतूद आहे; पण फक्त अशा परवानगीच्या निमित्ताने व्यवहार खोळंबविण्यासाठी ही शक्कल लढविल्या गेल्याचे बोलल्या जात आहे. अकोला बाजार समितीमध्ये वसूल केल्या जाणार्‍या अडतीचा दर हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. तरीही तो देण्यास विरोध करून खरेदीदारांनी गेल्या दोन आठवड्यापासून व्यवहार खोळंबविले आहेत. काही व्यापार्‍यांनी दीड टक्क्याऐवजी एक टक्का देण्याची तयारी दाखवून पैशांचा चुकारा मात्र तब्बल दहा दिवसांनी करण्याचा नवा प्रस्ताव समोर आणल्याचे समजते; पण नियमानुसार पैशांचा चुकारा २४ तासात करणे बंधनकारक असल्याने असा प्रस्ताव मंजूर होण्याचा प्रश्नच नाही. मूठभर खरेदीदारांच्या या आडमुठय़ा धोरणाने ऐन शेतकर्‍यांच्या गरजेच्या काळात बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होऊन शेतकरी वेठीस धरल्या गेले आहेत. सोबतच अडते व बाजार समित्यांमधील कामगारही वेठीस धरल्या गेले आहेत; पण या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी आता शेतकरी संघटना व शेतकर्‍यांच्या नेत्यांनाही वेळ नसल्याचे दिसून येते. दोन आठवड्यांपासून शेतकर्‍यांना वेठीस धरणार्‍या या प्रकाराकडे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. भाजप सरकारच्या या चांगल्या निर्णयाला खुला विरोध करून सरकारला अप्रत्यक्ष आव्हान देणार्‍यांपैकी काही जण हे भाजपच्या अत्यंत जवळचे असल्याचीही चर्चा आहे.