शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवपूर परिसरात दोन बछड्यांसह वाघ आढळला

By admin | Updated: November 14, 2016 02:55 IST

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

शिवपूर(जि.अकोला), दि. १३- शेतशिवारात काही मजुरांना दोन बछड्यांसह वाघ आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाने काही दिवसांपूर्वी एका बकरीची शिकार केली होती. या वाघाला वन विभागाने जंगलात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवपूर येथील नदीच्या काठावरील शेतात १३ नोव्हेंबर रोजी काही शेतमजुरांना दोन बछड्यांसह वाघ आढळला. या शेतमजुरांनी ही बाब गावात येऊन सांगितली. त्यानंतर वाघाला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याविषयी वन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. दुपारी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या वाघाला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी या भागात एका बकरीची शिकार झाली होती. ती शिकारही वाघानेच केल्याचा अंदाज शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. वाघाचा वावर असल्याची वार्ता गावात पोहोचल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शिवपूर परिसरात शेतीची कामे सुरू आहेत; परंतु आता कामे करण्यास जाण्यासाठी शेतकरी घाबरत असल्याचे चित्र आहे. वन विभागाला आढळले ठसे शेतमजुरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वन विभागाला वाघाच्या पायाचे ठसे आढळले आहेत. या परिसरात वाघाचा वावर आहे, याला वन विभागानेही दुजोरा दिला आहे. तसेच वन विभागाने ग्रामस्थांची गर्दी पोलिसांच्या मदतीने हटविली आहे. या मादी वाघाने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला असल्याने एकाच जागेवर राहत असल्याचे ठशांवरून आढळले. त्यामुळे, सध्या त्यांच्यावर वन विभागाच्या वतीने केवळ वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.