शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टायफाइडचे थैमान; उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST

मागील दीड वर्षापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासनाने काेराेनाची नियमावली शिथिल केली असली तरी नागरिकांना ...

मागील दीड वर्षापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य शासनाने काेराेनाची नियमावली शिथिल केली असली तरी नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहून अनेक महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेले नागरिक सुसाट निघाल्याचे दिसत आहे. काेराेना अद्यापही कायम असल्याची जाणीव असतानादेखील ऐन पावसाळ्यात रस्त्यालगत उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. याचे परिणाम समाेर आले आहेत. सर्दी, अंगदुखी, ताप, खाेकला, घशात खवखव आदी व्हायरल फिव्हरची साथ पसरण्यासाेबतच आता टायफाइडचे रुग्ण माेठ्या संख्येने आढळून येत आहेत. टायफाइडपासून वाचण्यासाठी दूषित पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळणे गरजेचे आहे.

पाणीपुरी उठली अकाेलेकरांच्या जीवावर

पावसाळ्यात साथराेगांचा फैलाव अधिक तीव्रतेने हाेताे. पाेटदुखी, उलटी हाेणे, छातीत जळजळ यांसह टायफाइडच्या प्रसाराला पाणीपुरी कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या तिखट पाण्यात विक्रेता अनेकदा हात बुडवताे. हात पुसण्यासाठी मळकट कापडाचा वापर करताे. हीच पाणीपुरी अकाेलेकरांच्या जीवावर उठल्याचे डाॅक्टर सांगतात.

या ठिकाणी खवय्यांची गर्दी

गांधी चाैकातील चाैपाटी, जय हिंद चाैकातील दहिवडा, बागातील देवी मंदिरासमाेर, कारमेल काॅन्व्हेंटलगतचा परिसर, जठारपेठ चाैक, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचा परिसर, जिल्हा परिषदेची आवारभिंत, सर्वाेपचार रुग्णालयाची आवारभिंत, नेहरू पार्क चाैक, मनपाच्या एलबीटी कार्यालयाची आवारभिंत तसेच संत तुकाराम चाैकात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी दिसून येते.

दिवसातून किमान तीन-चार वेळा तापात चढउतार हाेऊन पाेट दुखते. हा मुदती ताप आहे. उघड्यावरील चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याऐवजी घरीच नाश्ता किंवा खाद्यपदार्थ तयार करण्याची गरज आहे. जेणेकरून रुग्णालयात जाण्याची वेळ येणार नाही.

- डाॅ. अस्मिता पाठक, वैद्यकीय आराेग्य अधिकारी, मनपा