शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस मात्र कूल!

By admin | Updated: January 22, 2015 01:57 IST

अकोला पोलिसांची गस्त केवळ नावालाच.

अकोला: गत महिनाभरापासून शहरात लुटमार, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या आणि खंडणी मागणीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आठवडाभरापासून शहरामध्ये चोरटे, घरफोड्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, पोलीस मात्र कूल आहेत. घटना घडल्यानंतर पोलीस केवळ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि तपास सुरू असल्याचे सांगतात. मात्र घटना घडून वर्ष, दोन वर्ष उलटून जातात, तरी घटनांचा तपासही होत नाही आणि चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न होत नाही.गत महिनाभरामध्ये शहरामध्ये लुटमारीच्या चार, चेन स्नॅचिंगच्या सहा, कारमधील रोकड लंपास केल्याच्या, चोरीच्या, घरफोडीच्या घटना घडल्या; परंतु या घटनांचा तपास करण्यामध्ये पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. खंडणी, धमक्यांच्या प्रकारांसोबतच व्यापार्‍यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख लुटून नेण्याच्या घटना वाढल्या. महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली. तसेच घरफोडी व चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनाही घडत आहेत. पोलीस ठाण्यामध्ये तक्रारींनुसार आरोपींवर गुन्हा दाखल होतो; परंतु या घटनांचा तपास मात्र वर्षोगणती लागत नाही. तक्रारकर्ता पोलीस ठाण्याच्या पायर्‍या झिजवून कंटाळतो; परंतु त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे, तपास सुरू आहे. एवढेच सांगून त्याची बोळवण केली जाते. प्रसंगी त्याला शिवीगाळ करून पोलीस ठाण्यामधून हाकलून देण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांमुळे अनेक नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या भानगडीत पडतदेखील नाहीत. *दीड महिन्यांमधील घटनांचा आलेख चोरी             २१घरफोडी        १0चेन स्नॅचिंग   १३खंडणी          0४लूटमार         0६

*गत पंधरा दिवसांमधील घटनाचोरी           0५घरफोडी       0४चेन स्नॅचिंग 0३लूटमार        0२