शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकनृत्याच्या तालावर सारेच थिरकले !

By admin | Updated: September 30, 2015 00:25 IST

लोककलेला पहिल्याच दिवशी प्रेषकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खामगाव: लावणी, भारुड, गरबा अशा विविध सादर केलेल्या लोककलेला पहिल्याच दिवशी प्रेषकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर झाल्याने लोकनृत्याला सभागृहाने अक्षरश: डोक्यावर घेतले. पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्यच लोकनृत्य ठरले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव २0१५-१६ चे स्थानिक जी.एस.महाविद्यालयावर आयोजित असून, मंगळवारी उद्घाटन झाले. महाविद्यालयाच्या इनडोअर हॉलमध्ये लोकनृत्य सादरीकरण झाले. पहिल्या दिवशी बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील महाविद्यालयांना लोकनृत्यांची संधी मिळाली. चला जाऊ बाजारी, या बहारदार गीताने लोकनृत्याची सुरुवात झाली; परंतु परीक्षकांनी हे गीत बाद ठरविले. यानंतर गरबा, उदे ग अंबे उदे, चला गं मंगळा गौरीचा करुया जागर, अंबाबाईचा जोगवा अशा एकापेक्षा एक सरस कलाविष्काराने सभागृह दणाणून सोडले. विद्यार्थ्यांंंच्या टाळ्या, शिट्यांचा आवाज यामुळे कला सादर करणार्‍यांचाही उत्साह कमालीचा वाढला होता. युवा महोत्सवात इतरही कार्यक्रमाचे आयोजन असताना लोकनृत्याला प्रेषकांची उपस्थिती लक्षणीय होती. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.बी.एम.डोंगरे तर परीक्षक म्हणून गौरी ठाकरे अमरावती, अँड.रसिक वडवेकर अमरावती, प्रा.डॉ.सीमा देशमुख, प्रा.एम.आर.इंगळे यांनी जबाबदारी पार पाडली. यामध्ये जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींग बुलडाणा, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव, अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली, गो.से.महाविद्यालय खामगाव, कला, विज्ञान महिला महाविद्यालय मेहकर, अनुराधा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग चिखली, श्रीमती के.के.अग्रवाल कला, वाणिज्य महाविद्यालय मलकापूर, एम.ई.एस.कला, वाणिज्य महाविद्यालय मेहकर, श्रीमती एस.आर.मोहता महिला महाविद्यालय खामगाव, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग शेगाव, माउली कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड टेक्नॉलॉजी शेगाव या महाविद्यालयांनी सहभाग दिला.