शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: February 22, 2017 02:31 IST

आरोपीस अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

चिखली, दि. २१- महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणार्‍या तीन वर्षीय चिमुरडीवर शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या १९ वर्षीय पवन शेवत्रे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणार्‍या एका तीन वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे १५ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत आल्यानंतर केली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला पोटदुखीवरचे औषध दिले होते. दरम्यान, १६ तारखेला सुटी असल्याने ती घरीच होती. मात्र, १७ तारखेला पुन्हा शाळेतून आल्यानंतर तिचे पोट दुखत असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले. त्यावरून या चिमुरडीच्या आईने शाळेत शिक्षिकेला विचारणा केली. मात्र, शाळेत खेळत असताना लागले असेल म्हणून याबाबीकडे दुर्लक्ष केले होते. १८ व १९ फेब्रुवारी रोजी तिला बरे वाटत नसल्याने ती शाळेत गेली नाही. मात्र, २0 फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेत ही चिमुरडी आपल्या आईसोबत गेली असता तेथे पवन शेवत्रे याला पाहून किंचाळली व रडू लागली व नराधमास पाहून भेदरलेली ही चिमुरडी शाळेत जाण्यास नकार देऊ लागली. दरम्यान, या प्रकारावरून एक सुजाण महिला नातेवाईकेने समयसूचकतेने व चिमुरडीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्याने शाळेतील हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी नराधम पवन शेवत्रे याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा न्यायालयाने त्यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.