पोपटखेड (अकोला): कुपोषणामुळे तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आकोट तालुक्यातील पोपटखेड येथे १८ आॅगस्टच्या रात्री घडली. आदीवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे, या भागात आरोग्य विभागाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.पोपटखेड येथील संजय शंकर सोयाम यांचा तिन वर्षांचा मुलगा स्वप्निल संजय सोयाम हा जन्मताच कुपोषीत होता. त्याच्यावर उपचार सुरु होते.उपचारादरम्यान, १८ आॅगस्ट २०१७च्या रात्री त्याचा मृत्यू झाला. संजय सोयाम यांची आर्थीक स्थिती हलाखीची असून त्यांना तीन मुले आहे. त्याचा मोठा मुलगा सात वर्षांचा तर दुसरा पाच वर्षांचा आहे. तिसरा मुलगा स्वप्नील हा जन्माताच कुपोषित होता.
तीन वर्षीय बालकाचा कुपोषणाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 15:43 IST