शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची तीन वाहनांना धडक; सहा जण जखमी

By admin | Updated: July 22, 2016 00:23 IST

आकोट-अकोला मार्गावरील घटना; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

आकोट (जि. अकोला): भरधाव ट्रकने एकाच वेळी एसटी बस, इंडिका कार व मोटारसायकलला धडक दिल्याची घटना २१ जुलै रोजी दुपारी २.३0 वाजता सुमारास घडली. या अपघातात पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघात हा आकोट-अकोला मार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकोट शासकीय धान्य गोदामात धान्य पोहोचवून चालक प्रमोद प्रभाकर थोरात हा एम.एच. ३0 एल २३८३ क्रमांकाचा ट्रक चालवित अकोला येथे जात होता. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अकोला येथे जात असलेल्या एम एच ४0 एन ९७८८ क्रमांकाच्या एसटी बस, एम एच ३0 ए टी ७७९ क्रमांकाच्या इंडिका कारला व मोटारसायकल क्रमांक एम एच ३0 टी ४९८२ ला धडक दिली. या विचित्र अपघातात इंडिका कारमधील राजेंद्र विखे, राजेंद्र काकड, प्रवीण वासनकार रा. तेल्हारा हे किरकोळ तर गणेश डांबरे रा.वरवट बकाल हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच मोटारसायकल चालक संतोष प्रभाकर तायडे, अंजली प्रभाकर तायडे रा. मुंडगाव हेसुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. छावा संघटनेचे कार्यकर्ते व बोर्डी येथील संतोष खवले या युवकाने सहकार्य केले. या अपघातप्रकरणी एसटी बसचालक शेख शाबीर शेख इस्माईल यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रकचालक प्रमोद प्रभाकर थोरात (रा. आकोट फैल अकोला) याच्याविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, आर. डब्ल्यू. १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.