शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शेतक-याच्या नावाने तीनदा दिली मदत

By admin | Updated: February 9, 2016 02:25 IST

दुष्काळी मदत वाटपात हेराफेरी;अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी दिला चौकशीचा आदेश.

संतोष येलकर / अकोला: गतवर्षीच्या दुष्काळी मदत वाटपात गाव बदलून एकाच शेतकर्‍याच्या नावाने तीनदा मदत वाटप करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, अशाच प्रकारे आणखी काही बोगस लाभार्थ्यांना मदत वाटप करण्यात आल्याच्या शक्यतेच्या पृष्ठभूमीवर, अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत मदतनिधी प्राप्त झाला होता. एकरी १ हजार ८00 रुपयेप्रमाणे प्रशासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्यांसह धनादेशाद्वारे प्रशासनामार्फत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली. अकोला तालुक्यात म्हातोडी येथील श्रीकृष्ण वारके यांच्या नावाने म्हातोडी येथे दोन एकर शेती असून, पीक नुकसान भरपाईपोटी यांना एकरी १ हजार ८00 रुपयेप्रमाणे ३ हजार ६00 रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यानंतर घुसरवाडी येथे वारके यांची शेती नसतानाही, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत त्यांचे नाव टाकण्यात आले आणि ९ हजार रुपयेप्रमाणे १८ हजार रुपयांची मदत त्यांना देण्यात आली. म्हातोडी येथील तत्कालीन तलाठी गायत्री काकड यांनी तयार केलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्यानुसार ही मदत वाटप करण्यात आली. १८ हजार रुपयांच्या मदतीपैकी ९ हजार रुपयांच्या मदतीचा वारके यांचा धनादेश व अन्य एका शेतकर्‍याच्या मदतीचा धनादेश, त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अकोला तहसील कार्यालय अंतर्गत दहिहांडाचे मंडळ अधिकारी बी. रायबोले यांच्याकडे आला. रायबोले यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदत वाटपाच्या यादीची तपासणी केली असता, मदत वाटपाच्या यादीत म्हातोडी येथील श्रीकृष्ण वारके यांचे पुन्हा नाव आले असून, त्यांना मदत वाटपाचे तीनदा धनादेश देण्यात आल्याचे आढळून आले. हा प्रकार मंडळ अधिकारी रायबोले यांनी १७ जानेवारी रोजी अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार तहसीलदार हांडे यांनी यासंदर्भात नायब तहसीलदार पूजा माटोडे यांना चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.