शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अकोला जिल्ह्यातील तीन हजार विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 15:10 IST

यंदा ३,0३१ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे.

अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे यंदा प्रवेशाच्या आकडेवारीवरून दिसून आले. यंदा ३,0३१ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. अभियांत्रिकी शाखा, पॉलिटेक्निक करूनही खासगी कंपन्यांमध्ये कमी पगाराची नोकरी मिळत असल्याने, विद्यार्थ्यांनी आयटीआय शाखेला पसंती दिली आहे.काही वर्षांपूर्वी आयटीआय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अवकळा प्राप्त झाली होती; परंतु अलीकडच्या दोन वर्षांमध्ये आयटीआय शाखेकडे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून पाहिल्या जाऊ लागले आहे. खासगी कंपन्यासुद्धा अभियांत्रिकीची पदवी घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्याला कमी वेतनात नोकरी देत आहेत. मुंबई, पुणे येथील कंपन्यांमध्ये १५ ते २0 हजार रुपये वेतनामध्ये शेकडो आयटीआय विद्यार्थ्यांना नोकºया मिळत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्कील इंडियासारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहेत. एवढेच नाही तर केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच स्वतंत्र व्यवसाय उभारावा, हा उद्देश आहे. औद्योगिक प्रशिक्षणातून खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमाकडे कल प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील १00 टक्के म्हणजे ३,0३१ जागांवर प्रवेश झाले आहेत. एकही जागा यंदा रिक्त नाही. हे विशेष.आयटीआयमधील अभ्यासक्रमइलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्युटर आॅपरेटर, टर्नर, मोटार मॅकेनिक, वायरमन, पेंटर (जनरल) आणि मुलींसाठी सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (इंग्रजी), ड्रेसमेकिंग, बेसिक कॉसमॅटोलॉजी, बेकर कन्फेक्शनर, फ्रुट्स अ‍ॅण्ड व्हिजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर आॅपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटेरियर डेकोरेशन अ‍ॅण्ड डिझाइन, फॅशन डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखा उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेशअकोला- १,६८0बाळापूर- १७८मूर्तिजापूर- २३५बार्शीटाकळी- १७८तेल्हारा- १३१अकोट- ४७१पातूर- १२६

शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे आणि खासगी कंपन्यांसह महावितरण कंपनीत नोकरी सहज मिळते आणि स्वयंरोजगारही सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढल्यामुळे शासनानेसुद्धा यंदा आयटीआयची प्रवेश क्षमता १ लाख ३७ हजार जागांपर्यंत वाढविली. आयटीआयमध्ये जिल्ह्यातील सर्वच जागांवर प्रवेश झाले आहे. एकही जागा रिक्त राहिलेली नाही. हे यंदा प्रथमच घडले आहे.- महेश बंडगर,प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

 

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कोणताही विद्यार्थी रिक्त नाही. त्यांना सहज नोकरी उपलब्ध होते. त्यामुळेच आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. आयटीआयची एकही जागा रिक्त राहिली नाही. जागा कमी अन् विद्यार्थी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली.प्रमोद भंडारे,प्राचार्य, आयटीआय, मुलींची

 

टॅग्स :Akolaअकोलाiti collegeआयटीआय कॉलेजEducation Sectorशिक्षण क्षेत्र