अकोला : दिवाळीच्या दिवशी गुरुवारी सायंकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना विविध तीन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. केडिया प्लॉटमधील खंडेलवाल मारुती शोरुमच्या छतावर रॉकेट कोसळल्याने छतावरील काडी-कचर्याला आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर जुने शहरातील असदगड किल्ल्यावरील एका सुकलेल्या झाडाला फटाक्यांमुळेच आग लागली. या आगीमुळे किल्ल्यावर धावपळ सुरू झाली होती. तिसर्या घटनेत शास्त्रीनगर येथील रहिवासी किसनराव भालेराव यांच्या स्वयपांकगृहातील सिलिंडरने अचाणक पेट घेतला. त्यामुळे त्यांच्या घरी धावपळ झाली. या तीनही घटनांमध्ये सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारे फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवशी तीन ठिकाणी आग
By admin | Updated: October 25, 2014 01:09 IST