शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे आणखी तीन बळी; १४ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:16 IST

आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४० वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४० वर गेला आहे. तर आणखी १४ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३२७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला व नऊ पुरुष आहेत.यामध्ये मुर्तिजापूर येथील पाच व बार्शिटाकळी येथील दोन जणांसह गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.तीघांचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या तीघांचा बुधवारी मृत्यू झाला. यामध्ये गुलजारपूरा येथील ३५ वर्षीय महिला, कोठारी-पैलपाडा येथील ६५ वर्षीय पुरुष व तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुलजारपूरातील महिलेस १६ आॅगस्ट रोजी, पैलपाडा येथील रुग्णास १० आॅगस्ट रोजी, तर बेलखेड येथील रुग्णास १७ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.४२८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २७५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या