शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांवर जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर!

By admin | Updated: June 9, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यात चारा डेपो केव्हा उघडणार याबाबत शेतक-यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

संतोष येलकर / अकोलादुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, ३ लाख १४ हजार ८९७ जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी प्रशासनामार्फत चारा डेपो केव्हा उघडले जाणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे उत्पादन बुडाले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाईसह चारा टंचाई निर्माण झाली. सन २0१२ च्या पशुगणनेनुसार, जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय लहान ७४ हजार ७0२ आणि मोठे २ लाख ४0 हजार १९५ असे एकूण ३ लाख १४ हजार ८९७ पशुधन आहे. नापिकीच्या स्थितीत चारा उत्पादनाच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना जगविण्यासाठी चारा आणणार कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील गावागावांत शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला. चारा नसल्याने शेतकर्‍यांवर जनावरे विकण्याची वेळ आली. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील विविध भागात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठीचारा डेपो उघडण्याची उपाययोजना प्रशासनामार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग प्रस्ताव केव्हा सादर करणार?जिल्ह्यातील विविध भागात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असला तरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या दाव्यानुसार, जून अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे; परंतु गावागावांत निर्माण झालेल्या चाराटंचाईची स्थिती बघता, टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा डेपो उघडण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे केव्हा सादर करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.