शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख हेक्टरवर सिंचन क्षमता!

By admin | Updated: February 10, 2016 02:14 IST

विदर्भातच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी वळते करणे गरजेचे.

चिखली: विदर्भात नदीजोड प्रकल्प राबवून पावसाचे वाया जाणारे पाणी विदर्भातच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वळते करणे गरजेचे आहे त्यामधूनच सिंचनाची क्षमता वाढू शकते व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटू शकतो. ह्यवैनगंगा-नळगंगाह्ण नदीजोड प्रकल्प यासाठी उत्तम पर्याय होता या प्रकल्पाद्वारे तब्बल २.९0 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. ह्यवैनगंगा ते नळगंगाह्ण नदीजोड या प्रकल्पामुळे विदर्भातील नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, वर्धा व अमरावती विभागतील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या जिल्हय़ांना अतिरिक्त पाणी मिळू शकते. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास विदर्भातील तब्बल २.९0 लक्ष हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने साहजिकच विदर्भातील सिंचनाचा अनुषेश दूर होऊन संपूर्ण विदर्भ प्रांत ह्यसुजलाम्-सुफलाम्ह्ण होऊन औद्योगिक भरभराटीने विकासाचे वारे वाहणार. याशिवाय या प्रकल्पामुळे बुलडाणा व अकोला या अवर्षणप्रवण जिल्हय़ातील मोताळा, खामगाव आदी खारपाण पट्टय़ातील भागात तसेच जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोडून घाटाखालील जास्तीत जास्त गावांना पाणी मिळू शकतो. तथापि, विदर्भातील प्रस्तावित विजेचे औष्णिक प्रकल (थर्मल पॉवर स्टेशन) यांनाही पाणी उपलब्ध होऊन विदर्भातील विजेची मागणी पूर्ण होण्यासोबतच संपूर्ण विदर्भातील एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा होऊन औद्योगिक विकास साधल्या जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे विदर्भाला लागलेला शेतकरी आत्महत्येचा शाप या माध्यमातून दूर होऊन हा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारा आहे.