शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

By admin | Updated: December 12, 2014 01:25 IST

‘पॅकेज’ जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा.

संतोष येलकर / अकोलाअत्यल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांकडून सरकारी मदतीची प्रतीक्षा केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी अखेर गुरुवारी राज्य सरकारमार्फत सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेज ह्णजाहीर करण्यात आले. सरकारी मदतीच्या या पॅकेजमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा आधार मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळय़ात तब्बल दीड महिना पावसाने मारलेली दांडी आणि त्यानंतर अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. सोयाबीन सोबतच कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली; मात्र पावसाअभावी जमिनीतील ओल खोल खेल्याने, रब्बी पिकांचेही काही खरे नसल्याने नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सर्वच पिकांचे उत्पादन बुडाल्याने, नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी केवळ ४१ पैसे आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. पिके हातून गेल्याने जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना नापिकीचा फटका बसला. नापिकीमुळे दुष्काळी दुष्टचक्रात सापडल्याच्या स्थितीत सरकारकडून मदतीचा आधार केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. सरकारच्या या पॅकेजमध्ये दुष्काळाच्यास झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांपोटी २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळेल.