शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

तीन लाखांवर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

By admin | Updated: June 25, 2017 08:38 IST

प्रशासन गुंतले आकडेवारीमध्ये; नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांनाही दिलासा.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पभूधारक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे, या कर्जमाफीसाठी अकोला जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक तसेच पाच एकरापेक्षा जास्त ७३ हजार ४०० असे एकूण ३ लाख १७ हजार ३५० शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान, राज्यातील पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या आणि कर्ज थकीत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून रोजी केली होती. त्यानंतर निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत ११ जून रोजी तत्त्वत: मान्यता देण्यात आली; मात्र कोणकोणत्या निकषांच्या आधारे कर्जमाफी देण्यात येणार आणि निकषांच्या आधारे किती शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी पात्र ठरणार, याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर २४ जून रोजी कर्जमाफीची मर्यादा दीड लाखांपर्यंत वाढविल्याने सरसकट सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अकोल्यात तीन लाखांवर शेतकरी पात्र ठरले असले, तरी प्रत्यक्षात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही दीड लाखांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्यक्षात लाभ किती? जिल्ह्यात गेल्या वर्षी १०३१ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८७८ कोटी ५१ लाखांचे कर्ज वाटप झाले होते. या पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा वाटा मोठा होता. या बँकेने १ लाख २३ हजार शेतकऱ्यांना ८५२ कोटी ८४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीसाठी तीन लाखांवर शेतकरी पात्र ठरले असले, तरी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल, याची आकडेमोड आता बँकांच्या पातळीवर सुरू झाली आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या तालुका              अल्पभूधारक                 पाच एकरापेक्षा जास्त जमीनअकोला                ५६९४०                        २००२५बाळापूर               २९३७१                          ९३४७पातूर                  २५९५९                          ७०६६मूर्तिजापूर            ३४०१३                         १४२२८बार्शीटाकळी         २८८३३                          ६९७७अकोट                ३९३४०                            ९४४५तेल्हारा                २९४९४                           ६३१२