अकोला: अनियमितता केल्याचे आढळून आल्याने अकोला, आकोट व बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण उन्हाळे यांनी सोमवारी दिला. त्यामुळे ग्रामपंचायती अंतर्गत अनियमितता करणे, या तीनही ग्रामसेवकांना चांगलेच भोवले. अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनियमितता झाल्याचेआढळून आल्याने, गोरेगाव खुर्द येथील ग्रामसेवक के.पी.वाघ यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी दिला. तसेच अनियमितता केल्याचे निर्दशनास आल्याने, आकोट पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक एस.डब्ल्यू. अरुडकर आणि बाश्रीटाकळी पंचायत समिती अंतर्गत धानोरा येथील ग्रामसेवक पी.के.भोरे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उन्हाळे यांनी सोमवारी दिला. तीनही ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत सोमवारीच निर्गमित करण्यात आले. निलंबनाच्या या कारवाईने, या तीनही ग्रामसेवकांना अनियमितता करणे चांगलेच भोवले आहे
तीन ग्रामसेवक निलंबित
By admin | Updated: January 6, 2015 01:35 IST