शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहीहांडा ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न करणारे तीन जुगार माफिया गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी ...

दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होत असलेली विक्री बंद केली. त्यामुळे त्यांना लाच देण्याचे आमिष देऊन हे गोरखधंदे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न काही जुगार माफियांनी केला होता; मात्र ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या तत्त्वांना हे पटणारे नसल्याने त्यांनी या माफियांची टाळाटाळ केली; मात्र तरीही ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यावर राजकीय दबाव आणून धंदे सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी जुगार माफिया लाचेचे आमिष देत असल्याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आणि २१ मे रोजी पडताळणी केली असता शिवा गोपाळराव मगर (वय ३०), अभिजित रविकांत पागृत (३१, दोघे, रा. आकोट) व घनश्याम गजानन कडू (रा. लोतखेड, ता. अकोट) हे तिघे अवैध धंदे सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन हे तिघे शनिवारी पहाटे दहीहांडा पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी सापळा रचून असलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीनही जुगार माफियांना २५ हजारांची लाच देत असताना रंगेहाथ अटक केली. या जुगार माफियांविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.

रिव्हर्स ट्रॅपमुळे पोलिसांचे कौतुक

अकोला पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने असा रिव्हर्स ट्रॅप केल्यामुळे अकोला पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अकोला पोलिसांची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

जिल्ह्यातील दुसरा रिव्हर्स ट्रॅप

यापूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख यांना ५० हजार रुपयांची लाच देताना एका गुटखा माफियाविरुद्ध रिव्हर्स ट्रॅप करण्यात आला होता. त्यानंतर दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांना लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जुगार माफियांना बेड्या ठोकल्याने अकोला जिल्ह्यात हा दुसरा रिव्हर्स ट्रॅप झाल्याची माहिती आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण असल्याचेही वृत्त आहे.

अकोला पोलिसांची मान उंचावली

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी काही महिन्यांपूर्वी दहीहांडा पोलीस स्टेशनचा पदभार ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्याकडे दिला होता. त्यांनी परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यश मिळवले आहे. प्रकाश अहिरे यांना लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जुगार माफियांना अटक झाल्यामुळे अकोला पोलिसांची मान उंचावली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या योग्य कामकाजाची ही पावतीच असल्याचे बोलले जात आहे.