शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात तिघांचा मृत्यू, २६७ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ३०, मूर्तिजापूर येथील २१, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जुने शहर, न्यू तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, काँग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलीस क्वॉर्टर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी दोन, तर रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गीता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यू खेतान नगर, वाडेगाव, देशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यू राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हीएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

एक महिला व दोन पुरुषांचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या सांगवी बाजार ता. अकोला येथील ६५ वर्षीय महिला व शास्त्री नगर, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे ३ व १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी हिवरखेड, ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

२३३ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील ११, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पिटल येथील एक, आयुर्वेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० अशा एकूण २३३ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

४,७६९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,५०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,७६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.