शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

राष्ट्रसंतांच्या विचारांचा आजपासून तीन दिवस जागर

By admin | Updated: December 12, 2014 01:14 IST

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन; अमेरिकेच्या समाजसेविका गेल ऑम्वेट यांची उपस्थिती.

अकोला : दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन शुक्रवार, १२ डिसेंबरपासून अकोल्यातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सुरू होत आहे. या निमित्ताने भव्य मंडप टाकण्यात आला असून, संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १४ डिसेंबर अकोलेकरांना राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. संमेलनाला अमेरिकेतील प्रसिद्ध समाजसेविका गेल ऑम्वेट उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाची सुरुवात सकाळी ८ वाजता राजेश्‍वर मंदिरापासून ग्रंथदिंडीने होईल. ग्रंथपूजन अँड. दादा देशपांडे व माजी महापौर मदन भरगड यांच्या हस्ते होईल. साहित्य संमेलनाच्या सभागृहाला तुकारामदादा गीताचार्य यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी असून, उद्घाटन कविवर्य सुधाकर गायधनी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आदर्श गाव हिवरेबाजारचे शिल्पकार पोपटराव पवार, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ श्रीगुरुदेव विचार प्रचारक सत्यपाल महाराज, डॉ. सुनील गंधे, ज्ञानेश्‍वर रक्षक यांच्यासह अकोल्यातील सर्व आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनात युवक संमेलन, महिला संमेलन, भजन संमेलन, कृषी परिसंवाद, पत्रकारिता परिसंवाद, कायदेविषयक परिसंवाद, आरोग्यविषयक परिसंवाद, राष्ट्रीय कविसंमेलन आदींची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. सोबतच श्रमिक चळवळीचे नेते व विद्रोही चळवळीचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचेदेखील विचार रसिकांना ऐकता येणार आहे.