शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा तीन घरे फोडली!

By admin | Updated: February 7, 2017 03:30 IST

हिंगणा रोडवरील घटना; लाखाचा मुद्देमाल लंपास

अकोला, दि. ६- खदान परिसरातील बलोदे ले-आऊटमधील आनंद सागर अपार्टमेंटच्या एकाच मजल्यावरील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी भरदिवसा फोडून सुमारे एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, फ्लॅटमधील महिला या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्यानंतर अध्र्या तासाच्या आत ही चोरी केली. पोलिसांनी घटनास् थळावर श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ पथकांसह धाव घेतली. आनंदसागर अपार्टमेंटमधील महिला या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी सोमवारी दुपारी १२ वाजता नेहमीप्रमाणे गेल्या होत्या. घरी परत येण्यासाठी त्यांना अर्धातासाचा अवधी लागतो. याच अवधीचा फायदा घेत चोरट्यांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. १0२, १0३, १0५ च्या प्रवेशद्वाराचा कडीकोंडा लागोपाठ तोडला. १0५ मधील राजेश ढाकरे यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये रोख व आठ ग्रॅमची पोत, एक हजार रुपयाचा एक मोबाइल असा ऐवज लंपास केला. सचिन चव्हाण यांच्या फ्लॅट क्र. १0२ मधील १४ ग्रॅमची पोत, दहा हजार रुपये रोख तर नंदकिशोर नानोटे यांच्या फ्लॅट क्र. १0३ मधून चोरट्यांनी ४५ ग्रॅमची सोन्याची पोत, सात हजार रुपये रोख असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ज्यावेळी महिला घरी आल्या तेव्हा त्यांना फ्लॅटच्या प्रवेशद्वाराचा कडीकोंडा तोडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी खदान पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले. नंदकिशोर नानोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दा खल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, खदान पोलीस निरीक्षक गजानन शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मानसिंग चव्हाण यांच्यासह पथकाने भेट दिली.