शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

लाच घेताना तिघे अटकेत; तर बीडीओसह तीन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:35 AM

अकोला: अकोला पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या एका गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नऊ शौचालयांच्या बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे व ते मंजूर करण्यासाठी १४ हजार ९00 रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या अकोला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी गजानन एल. वेले, सहायक गटविकास अधिकारी एस. एम. पांडे, विस्तार अधिकारी आर. के. देशमुख, दोन कंत्राटी कर्मचारी व निंभोरा येथील सरपंचाचा मुलगा या सहा जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील तीन जणांना २ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून, बीडीओसह तिघे जण फरार झाले आहेत.

ठळक मुद्देलाचखोर बीडीओ, विस्तार अधिकार्‍यांसह सहा जणांवर गुन्हा१४ हजार ९00 रुपयांची लाचेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या एका गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नऊ शौचालयांच्या बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे व ते मंजूर करण्यासाठी १४ हजार ९00 रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या अकोला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी गजानन एल. वेले, सहायक गटविकास अधिकारी एस. एम. पांडे, विस्तार अधिकारी आर. के. देशमुख, दोन कंत्राटी कर्मचारी व निंभोरा येथील सरपंचाचा मुलगा या सहा जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील तीन जणांना २ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून, बीडीओसह तिघे जण फरार झाले आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला तालुक्यातील एका गावात नऊ शौचालयांच्या बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे व ते मंजूर करण्यासाठी अकोला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी जी. एल. वेले, सहायक गटविकास अधिकारी एस. एम. पांडे, विस्तार अधिकारी आर. के. देशमुख, कंत्राटी समूह समन्वयक स्वप्निल गोपाळराव बदरखे, प्रशांत मधुकर टाले व निंभोरा येथील सरपंचाचा मुलगा नितीन सुभाष ताथोड यांनी संगनमताने १४ हजार ९00 रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारकर्त्यास केली होती. त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अकोला पथकाकडे केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी लाचेची रक्कम घेण्याची जागा ठरली. या १४ हजार ९00 रुपयांमध्ये बीडीओ वेले याचे २ हजार रुपये, सहायक बीडीओ एस. एम. पांडे याचे ९00 रुपये, विस्तार अधिकारी देशमुखचे २ हजार रुपये, स्वप्निल बदरखे व प्रशांत टाले या दोघांचे एक हजार रुपये तर उर्वरित रक्कम ही नितीन ताथोड याची असल्याची माहिती आहे. या १४ हजार ९00 रुपयांच्या लाचेच्या रकमेतील २ हजार रुपयांची लाच विस्तार अधिकारी आर. के. देशमुख याने स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर लगेच स्वप्निल बदरखे, प्रशांत टाले या दोघांनाही अटक करण्यात आली; मात्र बीडीओ गजानन वेले, सहायक बीडीओ एस. एम. पांडे व नितीन ताथोड फरार झाला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.सध्या देशात टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा प्रचंड गाजत आहे. या सिनेम्यामध्ये टॉयलेट बांधण्यासाठी कुटुंबीयांचाच नव्हे, तर एका पूर्ण गावाचा विरोध असताना गावात टॉयलेट बांधण्यासाठी अभिनेता जीवाचा आटापिटा करतो; मात्र शासन स्तरावरूनही यामध्ये एक हजार कोटी रुपयांच्यावर भ्रष्टाचार झाल्यामुळे टॉयलेटची योजना अपयशी ठरल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे अकोला तालुक्यातील एका गावात नऊ शौचालये बांधण्यासाठी अकोला पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दिल्यानंतर यामध्ये लाचेची मागणी झाली आणि गटविकास अधिकारी, विस्तार अधिकार्‍यांसह सहा जणांना लाच घेण्याच्या प्रकरणाचा सामना करावा लागला, त्यामुळे अकोला पंचायत समितीत मंगळवारी ‘टॉयलेट’ एक लाचखोर कथा या चर्चेला उधाण आले होते.