शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरने दुचाकीस चिरडून अपघात घडविणारे तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST

अकाेला : आकाेट चाेहाेट्टा बाजार राेडवर गांधीग्राम येथील रहिवासी ऋषिकेश उर्फ चिंटू अशाेक सदांशिव या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ...

अकाेला : आकाेट चाेहाेट्टा बाजार राेडवर गांधीग्राम येथील रहिवासी ऋषिकेश उर्फ चिंटू अशाेक सदांशिव या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकासह तिघांना स्थानिक ‌गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. चिंटू त्याच्या बहिणीला सासरी साेडून परत येत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला हाेता. ताे जखमी असताना ट्रॅक्टरचालक व त्याच्यासाेबत असलेल्यांनी काहीही मदत न करता त्याचा माेबाइल पळवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हाेता.

ऋषिकेश उर्फ चिंटू अशाेक सदांशिव हा २७ मे २०२० राेजी त्याच्या बहिणीला शिरसाेली येथे साेडल्यानंतर दुचाकीने (क्र. एमएच ३० एजे ८२६३) परत येत असताना त्याला ट्रॅक्टरने (क्र. एमएच ३० इ ३९४७) जबर धडक दिली. यामध्ये ताे गंभीर जखमी झालेला असतानाही ट्रॅक्टरचालक पवन प्रमाेद डांगे, रा. दनाेरी, गणेश उर्फ मनीष सुभाष तळी, रा. पाताेंडा व कुंदन शिरखरे या तिघांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ऋषिकेश याच्या खिशातून माेबाइल व कागदपत्र गायब केले. या प्रकरणाची तक्रार राेशन सदांशिव यांनी दहीहांडा पाेलीस ठाण्यात केल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर ऋषिकेशच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनाचा शाेध सुरू केला असता ते वाहन संजय हरिभाऊ बुध यांच्या मालकीचे असल्याचे समाेर आले. यावरून त्या दिवशी ट्रॅक्टरवर असलेले पवन डांगे व गणेश तळी यांनीच हा अपघात केल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शुक्रवारी अटक केली. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर डाबेराव, संदीप काटकर, लीलाधर खंडारे, रवि पालीवार, विशाल माेरे, संदीप तवाडे, अनील राठाेड, गाेपाल ठाेंबरे, गणेश साेनाेने यांनी केली.