शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST

कुख्यात गुंड अनिल घ्यारेसह तिघांचा समावेश अकोला : अमरावती येथील रहिवासी असलेल्या डॉक्टरला ५ एप्रिल रोजी त्यांची कार अडवून ...

कुख्यात गुंड अनिल घ्यारेसह तिघांचा समावेश

अकोला : अमरावती येथील रहिवासी असलेल्या डॉक्टरला ५ एप्रिल रोजी त्यांची कार अडवून धारदार शस्त्राच्या धाकावर लुटणाऱ्या अकोल्यातील तीन गुंडांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.

अमरावती येथील डॉक्टर रितेश चौधरी हे ५ एप्रिल रोजी अकोला येथून त्यांच्या कारने अमरावतीकडे जात असताना शिवनीनजीक त्यांच्याशी कुख्यात गुंड अनिल गजानन घ्यारे (रा. आंबेडकरनगर), अनिल उर्फ जॉन नंदू गुडदे आणि सुनील मारुती खिल्लारे यांनी डॉक्टर रितेश चौधरी यांच्याशी विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्यांची कार अडवून धारदार शस्त्राच्या आधारे त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनेही या चोरीचा समांतर तपास सुरू केला असता त्यांना ही चोरी अनिल घ्यारे, अनिल गुडदे व सुनील खिल्लारे या तिघांनी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तीनही आरोपींनी डॉक्टरला धारदार शस्त्राच्या आधारे लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोणे, वसीम शेख, शक्ती कांबळे यांनी केली.