शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा तीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: October 27, 2016 03:37 IST

अकोला जुने शहरातील घटना; ९0 ग्रॅम सोन्यासह रोख पळविली!

अकोला, दि. २६- जुने शहरातील गोडबोले प्लॉट येथील शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी दुपारी भरदिवसा धिंगाणा घालत तब्बल दोन लाख ५0 हजार रुपयांचे ९0 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३0 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली. खंडेलवाल शाळेजवळ दीपक माहोरे व विद्या माहोरे यांचे विद्यादीप नावाचे टोलेजंग निवासस्थान आहे. दीपक माहोरे आणि विद्या माहोरे दोघेही जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेवर शिकविण्यासाठी गेल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घरात पाठीमागून असलेल्या सर्व्हिस लाइनमधून प्रवेश केला. घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घराच्या प्रत्येक खोलीत त्यांनी धिंगाणा घातला. खंडेलवाल महाविद्यालयासमोर हा प्रकार सुरू असतानाही कुणालाही शंका आली नाही. शेकडो विद्यार्थ्यांची या ठिकाणी रेलचेल असते; मात्र चोरट्यांनी समोरील दरवाजा उघडा ठेवून हा प्रताप केल्याने कुणालाही शंका आली नाही. या चोरट्यांनी खोलीमधील क पाटातून रोख २३ हजार ५00 रुपये आणि तब्बल दोन लाख रुपयांचे ९0 ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. माहोरे दाम्पत्य सायंकाळी घरी आले असता, त्यांना प्रवेशद्वार उघडे दिसले. यामुळे दोघेही अचंब्यात पडले. त्यांनी या प्रकाराची माहिती डाबकी रोड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले. श्‍वान पथकाने डाबकी रोडपर्यंत दिशा दर्शविली; मात्र त्यापुढे श्‍वान गेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.