शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४0 मातांसाठी तीन रुग्णवाहिका! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:41 IST

अकोला: जिल्हय़ातील गोर-गरीब आपल्या कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य देत असले तरी, येथे आल्यावर त्यांना सुविधा कमी आणि हेलपाटेच अधिक घ्यावे लागतात. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना त्यांच्या घरापासून रुग्णालयापर्यंत व तेथून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका नसल्याने गरिबांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी गाड्या भाड्याने घ्याव्या लागत असल्याचे वास्तव आहे.  रुग्णालयातून दररोज ४0 ते ४५ महिलांना ‘डिस्चार्ज’ दिला जातो. त्या तुलनेत रुग्णालयात शासनाच्या पाच रुग्णवाहिका असून, त्यापैकी दोन नादुरुस्त असल्याने आज रोजी केवळ तीन गाड्याच रुग्णसेवेत रुजू आहेत. 

ठळक मुद्देपाचपैकी दोन गाड्या नादुरुस्त गरिबांना सहन करावा लागतो भुर्दंडग्रामीण भागासाठी केवळ दोन गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील गोर-गरीब आपल्या कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य देत असले तरी, येथे आल्यावर त्यांना सुविधा कमी आणि हेलपाटेच अधिक घ्यावे लागतात. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना त्यांच्या घरापासून रुग्णालयापर्यंत व तेथून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका नसल्याने गरिबांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी गाड्या भाड्याने घ्याव्या लागत असल्याचे वास्तव आहे.  रुग्णालयातून दररोज ४0 ते ४५ महिलांना ‘डिस्चार्ज’ दिला जातो. त्या तुलनेत रुग्णालयात शासनाच्या पाच रुग्णवाहिका असून, त्यापैकी दोन नादुरुस्त असल्याने आज रोजी केवळ तीन गाड्याच रुग्णसेवेत रुजू आहेत. पूर्वाश्रमीच्या लेडी हार्डिंग्ज रुग्णालयाची ओळख आता जिल्हा स्त्री रुग्णालय अशी झाली आहे. खासगी दवाखान्यांमधील प्रसूतीचा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने गरीब व काही अंशी मध्यमवर्गीय कुटुंबातील गरोदर महिला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात येतात. या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांची संख्या अधिक असली, तरी त्या तुलनेत रुग्णालयातील खाटांची संख्या आणि इतर सुविधा तोकड्या पडत आहेत. जननी सुरक्षा व जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात आणणे व प्रसूतीपश्‍चात त्यांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी  पाच रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु गत काही दिवसांपासून या पाच रुग्णवाहिकांपैकी दोन नादुरुस्त आहेत. त्यामुळे सध्या तीन रुग्णवाहिकांवरच रुग्ण महिलांना घेऊन जाण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या महिलांपैकी दररोज साधारणपणे ४0 ते ४५ महिलांना सुटी होते. एका रुग्णवाहिकेत एकावेळी एक रुग्ण व सोबत एक नातेवाईक अशा आठ जणांचीच वाहतूक करता येते. डिस्चार्ज होणार्‍या महिलांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णालयातील गाड्या तोकड्या पडत आहेत. त्यामुळे अनेकांना नाइलाजास्तव खासगी गाड्या भाड्याने घेऊन घर गाठावे लागते.

ग्रामीण भागासाठी केवळ दोन गाड्यारुग्णालयात उपलब्ध असलेल्या पाच रुग्णवाहिकांपैकी दोन नादुरुस्त असल्याने सध्या केवळ तीन गाड्याच रुग्णसेवेत आहेत. यापैकी एक गाडी शहरासाठी असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी केवळ दोनच गाड्या उरतात. यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण महिलांना गाडी येईपर्यंत रुग्णालयातच वाट पाहत बसावे लागते.