शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 15, 2015 01:26 IST

नेहरू पार्क पाण्याच्या टाकीतून दूषित पाण्याचा पुरवठा.

अकोला : शहरातील उच्चभ्रू परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ३३ लिकेजेससह ५ व्हॉॅल्व निकामी असून, त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नेहरू पार्क समोर महापालिकेची मोठी पाण्याची टाकी आहे. या टाकीतून रामनगर, शास्त्रीनगर, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉटसह शहरातील उच्चभ्रू वस्तीत पाणीपुरवठा केला जातो. जवळपास ५0 हजार नागरिकांना या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविल्या जाते. या टाकीची स्वच्छता मागील अनेक वर्षांपासून झालेली नाही. तसेच टाकीच्या आजूबाजूला संरक्षण भिंत नाही. टाकीतून पाइपद्वारे खाली पाणी आणल्या जाते आणि खाली जिथे व्हॉल्व आहे तिथे मोठय़ा प्रमाणात घाण साचली आहे. ही घाण काढण्यात येत नसल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी पुढे नागरिकांना पोहोचविल्या जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहरू पार्क पाण्याच्या टाकीतून ज्या भागात पाणीपुरवठा होतो. त्या भागातील ३३ पाइपलाइनमध्ये लिकेजेस आहेत. सोबतच ६ व्हॉल्व निकामी आहेत, याची देखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे; परंतु दुरुस्ती होत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत आहे. यावर महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे सगळे आलबेल आहे. महापालिका प्रशासनाला आपल्या अधिकार्‍यांच्या केबिन सजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करता येतो; परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असलेल्या पाण्याचे व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी व पाइपलाइनचे लिकेज दुरुस्त करण्यासाठी पाच-पन्नास हजार रुपये नाहीत, ही खेदाची बाब आहे. तत्काळ दुरुस्ती न झाल्यास व पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ न झाल्यास घाण पाणी अधिकार्‍यांना पाजण्याचे आंदोलन करण्याची भूमीका नगरसेवक अजय शर्मा यांनी व्यक्त केली.