शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पैसे वाचवण्यासाठीच हजारो गावांना दुष्काळातून वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 02:57 IST

अकोला जिल्हय़ाच्या दौ-यात विखे पाटील यांचा युती शासनावर प्रहार.

अकोला: ग्रामीण भागात दुष्काळी कामावर पैसे खर्च होऊ नयेत, या हेतूनेच युती शासनाने गावाची आणेवारी कमीत कमी ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने राज्यासह विदर्भातील हजारो गावांमध्ये दुष्काळ असतानाही तो जाहीर झाला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी केली.दुष्काळी उपाययोजनांची समीक्षा व शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्यासाठी विखे पाटील ४ मार्च रोजी अकोला व वाशिम जिल्हय़ाच्या दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम, किनखेड, उगवाफटा, कापशी, पातूर तालुक्यातील बाभूळगाव आदी गावांना भेटी दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांशी त्यांनी याप्रसंगी संवाद साधला. शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बाभूळगाव येथे एका सभेत बोलताना त्यांनी भाजपा - शिवसेना सरकारला शेतकर्‍यांप्रति अजिबात आस्था नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकर्‍यासाठी तिजोरी खुली करायला हवी होती; परंतु हे सरकार तिजोरीतील पैसे कसे वाचतील याचाच विचार करण्यात व्यस्त आहे. मेक इंडिया, स्टॉर्टअप इंडिया यात महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, सर्वसामान्यांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे मेक इन, स्टॉर्ट अपच्या ऐवजी आता वाइंड अप अर्थात यांनाच गुंडाळण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. या सर्व पृष्ठभूमीवर आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाभूळगाव येथे आयोजित सभेत प्रक ाश तायडे यांनी प्रास्ताविकातून जिल्हय़ातील दुष्काळ व शेतकर्‍यांची व्यथा मांडली. जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हिदायत पटेल व माजी आमदार लक्ष्मण तायडे यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. दौर्‍यात विखे पाटील यांच्यासोबत आमदार अमित झनक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, माजी आमदार लक्ष्मण तायडे, प्रा. अजहर हुसेन, दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, प्रकाश तायडे, डॉ. सुधीर ढोणे, मनपातील विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, राजेश भारती, उषा विरक, साधना गावंडे, सुभाष पाटील गावंडे, महेश गणगणे, अविनाश देशमुख, हेमंत देशमुख, कामगार सेलचे नेते बद्रुज्जमा, नगरसेवक अब्दुल जब्बार प्रामुख्याने उपस्थित होते.