शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात हजारो शिधापत्रिका गॅस स्टॅम्पिंगशिवाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:13 IST

शिधापत्रिकांवर ‘गॅसधारक’ असे शंभर टक्के स्टॅम्पिंग न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट न्यायालयातच उभे करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

ठळक मुद्देगॅसधारक असलेल्या लाभार्थींना अनुदानित रॉकेलचे वाटप केले जात आहे. शिधापत्रिकांवर शंभर टक्के स्टॅम्पिंग करण्याची प्रक्रिया कोणत्याच जिल्ह्यात पूर्ण झालेली नाही. स्टॅम्पिंगचे काम पूर्ण न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची नावे न्यायालयात कळविण्याचा आदेशच शासनाने दिला.

अकोला : एक किंवा दोन गॅस सिलिंडर जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांनाही अनुदानित रॉकेलचे वाटप केले जात आहे. त्यातून शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असल्याप्रकरणी नागपूर खंडपीठात दाखल याचिकेनुसार गॅसधारक असलेल्या सर्व शिधापत्रिकांवर स्टॅम्पिंग करून त्यांचा रॉकेल पुरवठा बंद न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. शिधापत्रिकांवर ‘गॅसधारक’ असे शंभर टक्के स्टॅम्पिंग न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट न्यायालयातच उभे करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.गॅसधारक असलेल्या लाभार्थींना अनुदानित रॉकेलचे वाटप केले जात आहे. त्यातून शासन अनुदानाचा दुरुपयोग होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी गॅसधारकांचा रॉकेल पुरवठा बंद करण्याची तयारी शासनाने केली. एक किंवा दोन गॅस जोडणी असल्याचा शिक्का (स्टॅम्पिंग) शिधापत्रिकांवर करण्याचा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला; मात्र त्यानुसार शिधापत्रिकांवर शंभर टक्के स्टॅम्पिंग करण्याची प्रक्रिया कोणत्याच जिल्ह्यात पूर्ण झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी नागपूर खंडपीठात सुनावणीही सुरू आहे. स्टॅम्पिंगचे काम पूर्ण न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची नावे न्यायालयात कळविण्याचा आदेशच शासनाने दिला. आता युद्धपातळीवर गॅसधारक स्टॅम्पिंगचे काम सुरू करावे लागणार आहे. त्यातच १ आॅगस्टपासून गॅसधारकांना रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला. गॅस पुरवठा नसलेल्या शिधापत्रिकांची निश्चिती करणे अनिवार्य झाले आहे. गॅस एजन्सीकडून गॅसधारकांची यादी तातडीने मागविली जाणार आहे. गॅस एजन्सीधारकांनी यादी न दिल्यास त्यांच्यावरही जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.

अकोला जिल्ह्यात ५० टक्के स्टॅम्पिंगगॅसधारक शिधापत्रिकाधारक, अशी स्टॅम्पिंग झालेल्या शिधापत्रिका जिल्ह्यात ५० टक्के आहेत. उर्वरित शिधापत्रिकांवर स्टॅम्पिंगच्या कामाची गती वाढवावी लागणार आहे. जिल्ह्यात ३,५४,७२५ पैकी १,७६,६५४ शिधापत्रिकांचे स्टॅम्पिंग झाले आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcollectorजिल्हाधिकारी