शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मतदार यादीत फोटो नसलेल्यांनी बीएलओंकडे फोटो द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

मूर्तिजापूर : विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी बीएलओंकडे दोन दिवसांत ...

मूर्तिजापूर : विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी बीएलओंकडे दोन दिवसांत फोटो देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी केले आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेले तब्बल १५ हजार ९७ मतदार असून, त्यापैकी तालुक्यातील ८ हजार ५६ व बार्शिटाकळी तालुक्यातील ७ हजार ९४१ असे मतदार आहेत. या मतदारांसंदर्भात फोटो जमा करण्याबाबतचा आढावा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे, उपविभागीय अधिकाऱ्यांनी बीएलओंचा मतदारांचे फोटो जमा करण्याबाबत आढावा घेतला. यामध्ये बरेच मतदार स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये फोटो नाहीत, अशा मतदारांना आपला पासपोर्ट फोटो संबंधित बीएलओंकडे तीन दिवसांच्या आत जमा करावा, अन्यथा त्यांची नावे मतदार यादीमधून कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी फोटो त्वरित जमा करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी अभयसिंह मोहिते व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.