शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

‘त्या’ १३३ शिक्षकांच्या कागदपत्रांची झाडाझडती!

By admin | Updated: July 13, 2017 01:01 IST

अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना वगळल्याची शंका : बिंदू नामावली अंतिम करण्यासाठी मागितली माहिती

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बिंदू नामावली अंतिम करण्यासाठी जिल्ह्यातील १३३ शिक्षकांना त्यांची जातवैधता प्रमाणपत्र व मूळ नियुक्ती आदेश ५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले. त्याचवेळी अनुसूचित जमातींमधून नियुक्ती व जातवैधता सादर न केलेल्या शिक्षकांना त्यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे. बिंदू नामावली निश्चित करणाऱ्या संबंधितांकडून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा प्रकारही घडत असल्याचे यानिमित्ताने पुढे येत आहे.शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा मुद्दा २००७ पासून अधांतरी असल्याने तो तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वच स्तरातून मागणी होत आहे. त्यासाठी शिक्षक संघटनांसोबतच शासन स्तरावरूनही पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा परिषदेत शिक्षक भरती करताना २००१ पासून मोठाच घोटाळा झाला आहे. आरक्षित जागांवर नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची जातवैधता प्रमाणपत्रे न घेताच रुजू करून घेणे, घोटाळा उघड होण्याच्या शक्यतेने मूळ नियुक्ती आदेश गहाळ करणे, यासारखे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांची बिंदू नामावली अंतिम करणेही प्रशासनाला जमले नाही. त्यामुळे जातवैधता नसलेल्या १३२ शिक्षकांना नोकरीतून बडतर्फ करण्याच्या नोटिसही शिक्षण विभागाने बजावल्या. त्याचवेळी ३० जून रोजी १३३ शिक्षकांच्या नावाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सातही पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात शिक्षकांचे मूळ नियुक्ती आदेश, जातवैधता प्रमाणपत्र ५ जुलैपर्यंत सादर करण्याची मुदत दिली. त्यानुसार ५९ शिक्षकांचे जातवैधता प्रमाणपत्र अद्यापही मिळाले नसल्याची माहिती आहे, तर ७४ शिक्षकांनी ते दिल्याचे शिक्षण विभागाच्या नोटिसवरून दिसत आहे. अनुसूचित जमाती शिक्षक वगळले!गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात जातवैधता न देणाऱ्या अनुसूचित जमातींच्या जागेवर नियुक्ती झालेल्या शिक्षकांची नावेच नाहीत. विशेष म्हणजे, त्या शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाचा आणि जातवैधता दिली नसल्याचे पुरावेही शिक्षण विभागात उपलब्ध असताना त्यांना वगळण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. बिंदू नामावलीप्रकरणी संबंधितांकडून शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ११४ शिक्षकांचे मूळ आदेश नाहीत... शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रानुसार १३३ पैकी ११४ शिक्षकांचे मूळ आदेशच नसल्याची माहिती आहे. त्या शिक्षकांकडून मूळ आदेश आणि जातवैधता प्रमाणपत्र तातडीने जमा करण्याचे पत्रात बजावण्यात आले आहे.