शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

रेल्वे रूळ परिसरातील नागरिकांची कसून चौकशी

By admin | Updated: March 7, 2017 02:25 IST

नागरिकांचे नोंदविले बयान; जीआरपी लागली कामाला.

अकोला, दि. ६- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र काढून ते रुळावर टाकल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे. रेल्वे रुळावर घडलेल्या या प्रकारामुळे जीआरपीने अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. जीआरपीचे प्रमुख सम्युअल वानखडे यांनी सोमवारी या परिसरातील काहींचे बयान नोंदविले असून आणखी काही जणांची चौकशी करून त्यांचे बयान नोंदविण्यात येणार आहेत.रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजून ७ मिनिटांनी या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निरोधक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले होते. अज्ञात व्यक्तीने घातपात म्हणा किंवा खोडसाळपणे इंजीनमधील अग्निरोधक यंत्र रुळाच्या बाजूला फेकले होते. त्यामुळे हे अग्निरोधक यंत्र दगडावर पडल्याने ते पंर झाल्याने यामधील द्रवाची गळती झाली. रेल्वे रुळावर तेही अकोट फैल पुलाखाली हा प्रकार घडल्याने अकोला पोलीस प्रशासनासह दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक, नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जीआरपी, आरपीएफचे धाबे दणाणले होते. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेचा शोध सुरू केला आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे उघड झाले आहे. पायलटची हलगर्जी; पोलीस यंत्रणा कामालारेल्वे इंजीन बंद न करता तसेच बाहेर फिरणार्‍या पायलटच्या हलगर्जी कारभारामुळे हा प्रकार घडला. सदर पायलट आरामात आहे; मात्र या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दहशतवादविरोधी पथकासह अकोला पोलीस आणि जीआरपी पोलीस आता रात्रंदिवस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.आरपीएफचे दुर्लक्षआरपीएफ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला; मात्र आरपीएफच्या एकाही कर्मचार्‍याला हा प्रकार दिसला नाही. रात्री २ वाजेची वेळ असल्याने आरपीएफचे जवान आणि अधिकारी गस्त सोडून झोपेत असल्याची माहिती आहे.अकोट फैल पुलाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे सखोल चौकशी करण्यात येत आहे. आजूबाजूच्या नागरिकांचे बयान नोंदविण्यात आले आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असून पोलीस त्या दिशेने काम करीत आहेत.- सम्युअल वानखडेठाणेदार, जीआरपी