शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

तिसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन खामगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 15:50 IST

अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे.

अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिक नवनाथ मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तेजेंद्रसिंग चौहाण यांची निवड झाली आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजक अरविंद शिंगोडे यांनी दिली.जिल्हा परिषद विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंगोडे यांनी साहित्य संमेलनाची माहिती दिली. संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी सृजन साहित्य संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष कवियत्री वनिता गावंडे यांची निवड करण्यात आली. यंदाचे तिसरे वर्ष असून पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दुर्गेश सोनार तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद युवा कवी किशोर बळी यांनी भुषविले होते. या साहित्य संमेलनामध्ये दरवर्षी प्रतिभावान युवक युवतींचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या साहित्य संमेलनात पर्यावरण विषयावर विचारमंथन होणार आहे.

संमेलनाध्यक्ष गोरे यांचा परिचययुवा साहित्यिक नवनाथ गोरे हे निगडी बुद्रूक जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत. त्याच्या फेसाटी या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झाले आहे. या कादंबरीस युवा साहित्य अकादमीचा सन २०१८ चा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. फेसाटी कादंबरीस अनेक राज्य-राष्ट्रीयस्तर सन्मान प्राप्त झाले आहेत. जळगाव येथील संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कादंबरीचा समावेश करण्यात आला आहे. बौध्द तत्वज्ञानाचा मराठी संत कवितेवरील प्रभाव या बृहद संशोधन प्रकल्पावर संशोधन केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्यkhamgaonखामगाव