शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘फीट इंडिया’त जिल्हा राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST

रवि दामोदर अकोला : फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन ...

रवि दामोदर

अकोला : फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.

मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र शासनाने ‘फीट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सृदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळा स्तरावर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे भरण्यात यावी आदी उद्देश यशस्वी व्हावे याकरिता फीट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यातून जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८६४ पैकी १२४३ शाळांची नोंदणी झाली असून, उर्वरित शाळांच्या नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शाळेत विविध खेळ, स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १७६७ पैकी १६११ अशा ९१.१७ टक्के शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फीट इंडिया मोहिमेंतर्गत १,०९,९०८ पैकी ५०,८३८ शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

--------------------------------------------------

टॉप-५ जिल्हे

जिल्हा एकूण शाळा नोंदणी झालेल्या शाळा टक्केवारी

मुंबई १७६७ १६११ ९१.१७ टक्के

वर्धा १५१२ १०७४ ७१.०३ टक्के

अकोला १८६४ १२४३ ६६.३८ टक्के

सिंधुदुर्ग १७३७ ११४५ ६५.९२ टक्के

यवतमाळ ३३४७ २१०० ६२.७४ टक्के

-----------------------------------------------

जिल्ह्यात फीट इंडिया मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातून प्रथम क्रमांकावर येण्यासाठी उर्वरित शाळांनी नोंदणी पूर्ण करावी.

-दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी, अकोला