शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विक्की खपाटे खुनातील तिसरा आरोपी गजाआड

By admin | Updated: July 1, 2017 00:38 IST

कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने तिसरा आरोपी राजू काटोलेस शुक्रवारी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरिहरपेठेतील रहिवासी तथा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे (३२) याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने तिसरा आरोपी राजू काटोलेस शुक्रवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हरिहरपेठेतील गाडगे नगरातील रहिवासी विकास खपाटे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने झालेल्या वादातून योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. खपाटे हा गाडगे नगरात असताना सोमवार, २६ जून रोजी दुपारी त्याच्यावर चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांनी आपसी वादातून धारदार कुऱ्हाड व लोखंडी पाइपने हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेला विक्की रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता, तर परिसरातील काही युवकांनी जखमी अवस्थेतच विकासला खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. यामधील करण साहू आणि नितीन साहू या दोन आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली होती तर राजू काटोले हा फरार होता. याला शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने अटक केली असून, चवथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आणखी चार नावे आली समोरया प्रकरणात सुमीत मोहोकार, बंटी सटवाले, रोशन ताकवाले आणि गुंजन कावडे ही चार नावेही समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या चार जणांचा खून प्रकरणात समावेश आहे की नाही, यासंदर्भात पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.