शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात चोरट्यांचा मनसोक्त धुमाकूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:05 IST

अकोला : शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला आहे. दोन दिवसांमध्ये शहरातील डाबकी रोड, अकोट फैल, खदानसह ग्रामीण भागातील वाडेगाव, सस्ती, मूर्तिजापूर, बाळापुरात तब्बल सातच्यावर चोर्‍या झालेल्या असून, तीन ठिकाणी लुटमार झाली आहे. जिल्हाभर चोरट्यांनी  मनसोक्त धुमाकूळ घातल्याने यामधील एकाही चोरट्यास अटक करण्यात किंवा चोर्‍या रोखण्यात पोलिसांना यश आले नसल्याने या चोरट्यांनी पोलिसांनी खुले आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण भागात चोर्‍यांचे सत्र दोन दिवसांत सात चोर्‍या, तीन ठिकाणी लुटमारशहराचे अधिकारी करताहेत तरी काय?

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला आहे. दोन दिवसांमध्ये शहरातील डाबकी रोड, अकोट फैल, खदानसह ग्रामीण भागातील वाडेगाव, सस्ती, मूर्तिजापूर, बाळापुरात तब्बल सातच्यावर चोर्‍या झालेल्या असून, तीन ठिकाणी लुटमार झाली आहे. जिल्हाभर चोरट्यांनी  मनसोक्त धुमाकूळ घातल्याने यामधील एकाही चोरट्यास अटक करण्यात किंवा चोर्‍या रोखण्यात पोलिसांना यश आले नसल्याने या चोरट्यांनी पोलिसांनी खुले आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हय़ातील तब्बल १३ ठाणेदारांच्या बदल्या केल्या. यामध्ये अकोट शहरासह माना, तेल्हारा व पातूरचा समावेश आहे. यावेळी कलासागर यांनी ऑन रोड पोलिसिंग राबविण्याचा तसेच नागरिकांमध्ये जाऊन पोलिसिंग करा, त्यांच्यात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांचे जे खरे कर्तव्य आहे, त्याकडेच पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चोरट्यांनी सुरू केलेल्या चोर्‍यांच्या सपाट्यावरून दिसून येत आहे. अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक लाखाचे दागिने लंपास करण्यात आले, त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठय़ा चोर्‍या झाल्या असून, तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल पळविला, तर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांना लुटण्यात आले असून, तीन ठिकाणी घरफोड्या झालेल्या आहेत. यावरून नवीन ठाणेदारांना चकमा देऊन पोलीस कर्मचार्‍यांनी आराम सुरू केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचा मनसोक्त धुमाकूळ सुरू असताना पोलिसांना एकही चोरटा अद्याप दिसला नाही, एवढेच काय तर संशयितही पोलिसांना मिळाले नाहीत. याउलट ठाणेदारांना अनभिज्ञ ठेवत वसुलीसाठी जुने प्रकरणं उखरण्याचा प्रताप काही पोलीस कर्मचार्‍यांनी सुरू केला आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष असून, नागरिकांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे.

शहराचे अधिकारी करताहेत तरी काय?संपूर्ण अकोला शहराची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. दिवसाढवळय़ा घरफोड्या करण्यात येत आहेत, तर खुलेआम लुटमारही सुरू असताना शहराची जबाबदारी असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी करताहेत तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मात्र, त्याकडे संबंधित अधिकार्‍यांचे सार्फ दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे.