शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षात ४८ लाख कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासणार!

By admin | Updated: April 29, 2016 02:07 IST

शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज; संजय खडक्कार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

अकोला: सध्या केंद्र आणि राज्य सरकारने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे; मात्र प्रत्यक्षात सध्याची शिक्षण पद्धती बघता आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे अशक्य असल्याचे दिसते. पुढील दहा वर्षांत लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि प्रत्यक्षात तयार होणारे मनुष्यबळ यातील तफावत बघता ४८ लाख कुशल कामगारांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. राज्यातील सध्याच्या कौशल्य विकास शिक्षण पद्धतीत त्यासाठी आवश्यक बदल करण्याबाबत काही सूचनाही त्यांनी या पत्रातून केल्या आहेत. जगात सर्वात कमी कुशल मनुष्यबळ भारतात आहे. जगात चीनमध्ये ४८ टक्के, अमेरिकेकडे ५८ टक्के,र्जमनीत ७0 टक्के, कोरियात ९६ टक्के आणि ब्रिटनमध्ये ६८ टक्के कुशल मनुष्यबळ आहे. भारतात मात्र एकीकडे सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असलेला देश असतानाही अकुशल मनुष्यबळाचाच त्यात अधिक भरणा असल्याने विकासात येणार्‍या अडचणीबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यासाठी कौशल्य विकास करणार्‍या शिक्षण पद्धतीवर भर द्यावा लागेल, असे डॉ. खडक्कार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात पुढील दहा वर्षांमध्ये १.५ कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीचा विचार केल्यास या काळात राज्यातील विद्यापीठांमधून १ कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. उर्वरित ४८ लाख मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढे राहील. हा तुडवडा कसा भरून काढता येईल, याबाबत आतापासूनच सरकारने विचार करणे आवश्यक आहे. देशात उच्च शिक्षण देणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे २0१0 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद आहे.