शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

..अन कुटुंबीयांसोबत राहण्याचे स्वप्न राहिले अधुरे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:16 IST

अकोला :   लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध गवई यांचा लहान भाऊ शुभम दोन महिन्यांपूर्वीच लष्करात दाखल झाला. त्याला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार आहे, त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात भेटून शेगाव येथे जाण्याचे नियोजन करीत असतानाच सुमेधला दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात रविवारी पहाटे वीरमरण आले. अन् कुटुंबीयांसोबत राहण्याचे सुमेधचे स्वप्न स्वप्नच राहिले. सुमेध व त्याच्या सैन्यातील एका मित्राला काही दिवसांची सुटी मिळाली होती; मात्र संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात एकत्र येणार असल्याने सुमेधने येण्याचे रद्द केले आणि त्याचा मित्र १२ ऑगस्ट रोजी सुटी घेऊन घरी पोहोचला, तर सुमेध मातृभूमीच्या सेवेत या भारत मातेच्या कुशीत सामावला.

ठळक मुद्देसुटी मिळाल्यानंतर घरी येणे टाळले!रविवारी पहाटे दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात सुमेधला आले वीरमरण

सचिन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :   लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध गवई यांचा लहान भाऊ शुभम दोन महिन्यांपूर्वीच लष्करात दाखल झाला. त्याला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार आहे, त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात भेटून शेगाव येथे जाण्याचे नियोजन करीत असतानाच सुमेधला दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात रविवारी पहाटे वीरमरण आले. अन् कुटुंबीयांसोबत राहण्याचे सुमेधचे स्वप्न स्वप्नच राहिले. सुमेध व त्याच्या सैन्यातील एका मित्राला काही दिवसांची सुटी मिळाली होती; मात्र संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात एकत्र येणार असल्याने सुमेधने येण्याचे रद्द केले आणि त्याचा मित्र १२ ऑगस्ट रोजी सुटी घेऊन घरी पोहोचला, तर सुमेध मातृभूमीच्या सेवेत या भारत मातेच्या कुशीत सामावला.सुमेध वामनराव गवई यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता; मात्र दुसरीकडे देशसेवा करण्याची आवडही त्यांच्या मनात प्रचंड होती. पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला; मात्र बीएचे द्वितीय वर्षाला असतानाच दुसर्‍याच प्रयत्नात ते सागर येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत २0११ मध्ये निवड झाली. काही महिन्याअगोदरच सुमेध यांचा लहान भाऊ शुभम यांचीही सैन्य भरतीत निवड झाली. शुभमला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार असल्याने सुमेधनेही ऑक्टोबर महिन्यातच येण्याचा बेत आखून शेगावला जाण्याचे आई-वडील व बहिणीला सांगितले होते.  लवकरच कुटुंबाची भेट होणार या आनंदात दोघेही भाऊ देशसेवा करत होते; मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना सुमेध यांना शुक्रवारी वीरमरण आले . 

खासदार धोत्रे यांच्या मध्यस्थीने सुटला अंत्यसंस्काराचा प्रश्न!शहीद जवान सुमेध गवई यांच्यावर त्यांची जन्मभूमी असलेल्या लोणाग्रा येथे १४ ऑगस्ट रोजी लोणाग्रा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, स्मशानभूमीची दुरवस्था झालेली असल्याने ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या शेतात अंत्यसंस्कार व्हावे, अशी मागणी केली होती. यावर खासदार संजय धोत्रे यांनी मार्ग काढत गावातील सामाजिक कार्यकर्ते रमेश चांडक यांना विनंती करून, गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात शहीद सुमेध गवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे जागेबाबत असलेल्या वादावर पडदा पडला. 

शेतकर्‍यांचा रास्ता रोको रद्दशेतकरी आंदोलनासाठी सुकाणू समितीने १४ ऑगस्ट रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडूनही आंदोलनाची तयारी करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील लोणाग्रा येथील शहीद वीर सुमेध गवई यांना देशाच्या सीमेवर वीरमरण आले. त्यांच्यावर उद्या, १४ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होत आहेत. ही घटना पाहता जिल्हाभरात शेतकर्‍यांनी कुठेही रास्ता रोको न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जागर मंचने रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वीरजवान सुमेध गवई यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे म्हटले आहे. 

लोणाग्रा गावावर शोककळा!जम्मूतील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्याचे सुमेध गवई शहीद झाले. रविवारी पोलिसांकडून ही माहिती मिळताच लोणाग्रा गावावर शोककळा पसरली. दरम्यान, सुमेध हे शहीद झाल्याची वार्ता कळताच पंचक्रोशितील जनतेसह नेते, अधिकार्‍यांनी लोणाग्राकडे धाव घेतली. 

‘प्रहार’चे आंदोलन स्थगीतशेतकर्‍यांच्या प्रश्नांवर प्रहारतर्फे १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.  मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लोणाग्रा येथील जवान सुमेध गवई हे शहीद झाल्याने सोमवारचे आंदोलन प्रहारतर्फे स्थगित करण्यात आले आहे.