शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत देयक नाहीच; कंत्राटदारांच्या हातावर तुरी

By admin | Updated: November 7, 2014 00:46 IST

अकोला मनपा काढणार जलवाहिनी दुरुस्तीच्या निविदा.

अकोला : प्रशासनाच्या आदेशानुसार जलवाहिनी दुरुस्तीची कामे केल्यावर देयकांसाठी टाळाटाळ होत असल्याचे पाहून कंत्राटदारांनी बेमुदत उपोषण छेडले. थकीत देयकांचा मुद्दा निकाली काढण्याचे सोडून प्रशासनाने कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू केले असून, जलवाहिनी दुरुस्तीसाठी दहा लाख रुपयांची निविदा काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे थकीत देयकांची समस्या कायम राहणार असल्याने हा प्रकार म्हणजे कंत्राटदारांच्या हातावर तुरी देण्यासारखा असल्याचा आरोप होत आहे.महान धरणात केवळ ३४ टक्के जलसाठा उपलब्ध असून, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. आगामी दिवसातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, गळती लागलेल्या जलवाहिनी दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना, प्रशासनाने मात्र उलटा कारभार सुरू केल्याचे दिसत आहे. शहरातील जलवाहिनी दुरुस्तीचे काम निविदा प्रकियेनंतर पूर्ण करणार्‍या कंत्राटदारांना आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी थकीत देयक निश्‍चित अदा करण्याचे आश्‍वासन दिले होते. हा कंत्राट जुलै २0१४ मध्ये संपुष्टात आल्यानंतर प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात पुन्हा जलवाहिनी दुरुस्तीच्या निविदा जारी केल्या; परंतु मागील कामाचे देयक अदा केल्यानंतरच पुढील काम सुरू करण्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली. शिवाय, वर्कऑर्डर नसताना काम करण्याचा आदेश साफ धुडकावला. ही बाब जिव्हारी लागलेल्या आयुक्तांनी कंत्राटदारांचे देयक अदा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ चालवली. हा प्रकार पाहून कंत्राटदारांनी २0 ऑक्टोबरपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम बंद करीत बेमुदत उपोषण सुरू केले. जलप्रदाय विभागात देयके अदा करण्यास रोख रक्कम उपलब्ध असताना, प्रशासनाने मात्र तिसराच पाय काढला. देयकाच्या रकमेवर तोडगा न काढता, संपूर्ण शहरातील जलवाहिनी दुरुस्तीचे कंत्राट एकाच कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला असून, याकरिता दहा लाख रुपयांची निविदा प्रक्रिया काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये झोननिहाय प्रत्येकी अडीच लाख रुपयांची कामे करता येतील.