शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही

By admin | Updated: October 25, 2016 03:04 IST

अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणूका; अर्ज दाखल करण्याच्या चौकशीतच गेला दिवस.

अकोला, दि. २४- जिल्ह्यातील पाचही नगरपालिका निवडणुकांचा बिगुल खर्‍या अर्थाने २४ ऑक्टोबरपासून वाजला असून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी माहिती घेणेच पसंत केल्याने अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा आणि पातूरमध्ये एकही नामांकन दाखल झाले नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढणार आहे.इच्छुक उमेदवार नगर परिषदेचा कंत्राटदार नसावा, अशी अट ठेवण्यात आल्याने अनेकांची दुकानदारी थांबणार आहे; मात्र त्यातूनही पळवाट शोधण्याची तयारी सुरू असल्याची महिती आहे. तेल्हारा नगरपालीकेसाठी इच्छुकांनी सावध भूमिका घेत केवळ माहिती गोळा केली. त्यामुळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मोहन अकोटकर यांनी सांगितले. बाळापूरातही नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. नामांकन ऑनलाइन असल्याने येणार्‍या अडचणी व नियमावली पाहता अनेकांनी कार्यालयात चौकशी करून माहिती घेतल्याचे नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी. किर्दक यांनी सांगितले. मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक राहिला. २४ ऑक्टोबर रोजी एकही अर्ज दाखल झाला नाही. मूर्तिजापूर नगराध्यक्षासह २३ नगरसेवक पदासाठी २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरून नामांकन अर्ज दाखल करायचा असल्याने पहिल्या दिवशी इच्छुकांनी माहितीच घेतली. येत्या काही दिवसांत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे असाच प्रकार पातूर मध्ये आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष आपापले उमेदवार जुळवण्याच्या कामाला लागले आहेत. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार आपल्याला सोयीचा ठरेल, याची चाचपणी सुरू आहे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणे सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अनेक जण अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. संकेतस्थळावर अर्ज अपलोड झाले नाहीतआकोट नगर परिषद निवडणुकीत नामांकन भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज प्राप्त झाले नाही. विशेष म्हणजे अनेकांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता नेटकॅफे गाठून नामांकन भरून अपलोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित संकेतस्थळावर अर्ज अपलोड होत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात नेटकॅफे चालकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गीता ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनीही राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. २५ तारखेपासून संबंधित संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल होतील असे त्यांनी नेटकॅफे चालकांना सांगितले.